नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

आषाढी आठवणी

शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला.. […]

कशासाठी? ‘धाका’साठी!

एकाच छताखाली सर्वांना एकोप्याने बांधून ठेवणारं, टीव्ही बंद करुन खेळीमेळीने जेवण करायला लावणारं, घराबाहेर पडताना देवघरातील अंगारा कपाळावर लावायला सांगणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं व संकटाच्या वेळी देवांना पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं कुणीतरी मोठं माणूस घरात असायलाच हवं.. […]

बेंदूर’वाला मोहन

महाराष्ट्रातील बेंदूर सण. या दिवशी शेतकरी आपल्या रानधन्याला सजवतो. शेतीसाठी वर्षभर तो राबल्याबद्दल, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो… या सणावरुन मला माझ्या एका मित्राची आठवण होते.. त्याचं नाव मोहन! […]

ये रेशमी जुल्फे

मुमताजसाठी शहाजहानने ताजमहाल बांधला, हे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं. आमच्या पिढीनं हिंदी चित्रपटातील मुमताजसाठी, आपापल्या हृदयालाच ‘ताजमहाल’ केलेलं होतं… […]

चेहरे पावसाचे

तो मी नव्हेच’ नाटकामध्ये, ‘लखोबा लोखंडे’ची आपण अनेक रूपं पाहिली. त्यामध्ये व्यक्ती एकच होती, त्यानं बदलली होती ती, स्वतःची रूपं… तसंच आपल्याला आत्ताच्या पावसाबद्दल सांगता येईल.. पाऊस तोच, मात्र त्याचं पडण्याचं ठिकाण बदललं की, त्याची रूपंही बदलत जातात.. […]

शहर पुण्याचा कवी

जाहिरातींच्या व्यवसायातील सुमारे चाळीस वर्षांच्या कालावधीत, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आमच्या संपर्कात आली. साहित्य विषयाची तर मला शाळेपासूनच गोडी असल्याने, एखादा लेखक किंवा कवी भेटल्यावर, माझ्या आनंदाला पारावार रहात नाही.. […]

खिचडी

सदाशिव पेठेत असताना माझ्या लहानपणी, आई संकष्टी चतुर्थीला उपवास करायची. त्या दिवशी तिने केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमधील थोडी मलाही मिळायची. तेव्हापासून मला खिचडी जाम आवडू लागली.. […]

हरवलेला सण

आज नागपंचमीचा सण. श्रावणातील या पहिल्या सणाचं सुनीताला लहाणपणापासूनच मोठं आकर्षण वाटे. […]

भोग सरंल, सुख येईल

आपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला. […]

ऐकावे बण्डाजी, वाचावे बण्डाजी!

पंचावन्न वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. कोल्हापूरमधील एका माध्यमिक शाळेच्या वर्गात, मागच्या रांगेतील बाकावरील मुलं दंगा करीत होती. वर्गात सर आले, त्यांनी पाहिलं की, मागे बसलेल्या खोडकर मुलांमध्ये एक मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे.. त्यांनी त्या मुलाला शिक्षकांच्या खोलीत बोलावले व तू त्या मुलांच्या नादी लागून, बिघडू नकोस असे समजावले. नंतर तो मुलगा पुढील बाकावर बसून, अभ्यासात लक्ष घालून […]

1 30 31 32 33 34 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..