नवीन लेखन...
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

देव जरी मज, कधी भेटला

१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोलकरीण’ या मराठी चित्रपटातील हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आहे व पडद्यावर साकारलंय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी! […]

देसी ‘काऊबाॅय’

आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे! […]

जीव ‘रमला’

सहासष्ट वर्षांच्या आयुष्यात मी जीवनातील चढ-उतार पाहिले, यश-अपयश पाहिलं, नातीगोती पाहिली, श्रीमंती-गरीबी पाहिली, दुनियादारी पाहिली.. या मायानगरीत भेटलेल्या असंख्य मुखवट्यांमधून, मी खरा ‘चेहरा’ शोधत राहिलो. […]

डाकिया डाक लाया

राजशेखर मॅट्रिक झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला पोस्ट खात्यात लावून घेतले.. आणि त्याची पोस्टमनची नोकरी सुरु झाली. आमच्या भेटीसाठी कमी झाल्या. काही वर्षांनंतर तो घरी आला व लग्न ठरल्याचे त्याने आम्हाला सांगितले. भावी पत्नीचा फोटोदेखील त्याने पाकीटातून काढून आम्हाला दाखवला. […]

जोडे

जोडे म्हणजे आपल्या दोन पायांसाठी वापरलेल्या जाणाऱ्या लेदरच्या चपला. […]

कर भला

शिवाजी रोडने मंडईकडून शनिपार मार्गे ऑफिसवर पोहोचेपर्यंत वाटेत कधी कुणी गरजू वृद्ध स्त्री-पुरुष दिसले तर, त्यांना दोन-पाच रुपये देऊन पुढे जातो. हे पैसे देऊन मी फार मोठे कार्य करतोय असं नाही, तर मला तसं केल्याने एक आत्मिक समाधान लाभतं.. […]

गुरखा

माझ्या लहानपणी मी सदाशिव पेठेत रात्री हातात मोठी बॅटरी घेऊन फिरणारा गुरखा पाहिलेला आहे. त्याचा तो खाकी गणवेश, डोक्यावरील काळी तिरपी टोपी, त्या टोपीवर असलेले दोन खुकरीचे मेटलचे लावलेले चिन्ह अजूनही आठवतंय. त्यांचे चायनीज सारखे दिसणारे बारीक डोळे आणि गालावरील उभ्या असंख्य सुरकुत्या हीच त्यांची ओळख असायची. त्याच्या उजव्या हातात एक दंडुका असायचा. […]

पंगती-प्रपंच

संध्याकाळच्या सुमारास गाईम्हसरं डोंगरातून चरुन आल्यावर, जेवणाची पंगत बसायची. गावातील गुरवाकडून हिरव्या मोठ्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोण आणल्या जायच्या. गावातील चव्हाट्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला लांबलचक ओळीने बाप्या माणसं व त्यांच्याबरोबरची चिलीपिली मुलं, पाण्यासाठी बरोबर आणलेला तांब्या घेऊन जमिनीवर बसायची. […]

माझी प्रवास’साठी’

जन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो. […]

1 31 32 33 34 35 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..