नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाची ५० वर्षे

या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या. […]

‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ चित्रपट प्रदर्शित झाला

या सिनेमाने स्टीव्हन स्पीलबर्गपासून ते रिडली स्कॉट (२०१२ साली निर्मिलेल्या ‘प्रोमेथियस’ या गाजलेल्या सायन्स फिक्शन चित्रपटाचा दिग्दर्शक) पर्यंतच्या अनेक दिग्दर्शकांना प्रभावित केलं आहे. […]

इंटरनॅशनल माउंटन डे

संयुक्त राष्ट्र महासभाने २००२ साली संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय पर्वतीय वर्ष म्हणून घोषित केले आणि ११ डिसेंबर २००३ पासुन ‘इंटरनॅशनल माउंटन डे हा साजरा करण्यात येतो. दरवर्षी तो एका खास थीमसह साजरा केला जातो. […]

क्रिकेटपटू सुभाष गुप्ते

सुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे. […]

मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे

‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ या नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे या नावाप्रमाणेच सतत हसतमुख असणारी मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म ९ डिसेंबर रोजी झाला. सुरुवातीच्या काळात पडद्यावर मुख्य नायिकेच्या मागे नृत्य करत असतानाच, डोळयात आपणही एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे […]

डॉ. द्वारकानाथ कोटणीस

डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी […]

सेनानी महाराणी ताराराणी

महाराणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या. त्यांचा जन्म १६७५ रोजी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली […]

कोबोल या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर

कंप्यूटरच्या भाषांपैकी एक “कोबोल” या भाषेची निर्माती ग्रेस हॉपर यांचा जन्म ९ डिसेंबर १९०६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला. सुमारे ८० वर्षांपूर्वी “इंटरनेट’चे अस्तित्व कुणाला माहिती नव्हते. संगणकविज्ञान ही शाखा अगदी नवी होती. संशोधनाची साधने नव्हती. अशा परिस्थितीत संगणकविज्ञान आत्मसात करून “प्रोग्रॅमिंग’मध्ये अजरामर योगदान देणाऱ्या ग्रेस मरे हॉपर या पहिल्या महिला शास्त्रज्ञ! आपल्या असामान्य बुद्धीवैभवाने त्या अमेरिकन नौदलातल्या […]

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते उदय सबनीस

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला. उदय सबनीस यांना त्यांच्या जवळचे सॅबीदादा या नावानेच ओळखतात. ते उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबर ते उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुलुंड येथून तसेच नवभारत विद्यालय, मुंबई […]

पुण्यातील सिटी चर्च ला २२७ वर्षे पुर्ण

पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक सिटी चर्चने आज २२७ वर्षे पूर्ण केली आहेत. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील क्वार्टरगेट जवळील ऑर्नेलाज हायस्कूल शेजारी हे भव्य कॅथोलिक चर्च उभे आहे. “इमॅक्युलेट कन्सेप्शन ऑफ मदर मेरी” चर्च असेही याला संबोधले जाते. विशेष म्हणजे या सिटी चर्चच्या सभोवताली मोठी मुस्लिम वस्ती असून चर्चच्या कम्पाऊंड व भिंत व बाजूच्या मशिदीची भिंत एकच […]

1 123 124 125 126 127 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..