नवीन लेखन...

कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाची ५० वर्षे

११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना धरणाजवळ आतापर्यंतचा सर्वांत मोठा भूकंप झाला. आज त्याला ५० वर्षे उलटून गेली, तरीही या भूकंपाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नेमकेपणाने मिळालेली नाहीत. कदाचित आणखी काही दशकं ती मिळणारही नाहीत. कोयना धरणाजवळ निसर्गातल्या एका रहस्याचा शोध घेतला जातोय.

११ डिसेंबर १९६७ ला कोयनेच्या पहिल्या मोठया भूकंपाने सा-या महाराष्ट्राबरोबर जगालासुद्धा हादरवले. पहाटे ४.२१ वाजता कोयना धरणाच्या परिसरात अनपेक्षित भूकंपाचा धक्का बसून सारा पश्चिम महाराष्ट्र हादरला. या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या. या पडझडीत ११५ मृत्यू आणि सुमारे १,५०० लोक जखमी झाले. सामान्यतः भारताचा दक्षिण भाग भूकंपीय दृष्ट्या स्थिर समजला जात असल्यामुळे कोयना भूकंप अनपेक्षित होता. मुख्य भूकंपाच्या धक्क्यानंतर पुढे वर्षभर अनेक पश्चात् धक्के बसले व अजूनही कमी ऊर्जेचे धक्के अधूनमधून बसतात. ऐतिहासिक कालखंडात इथे कधीतरी भूकंप झाला होता. याच्या नोंदी नव्हत्या.

त्याचबरोबर भूकंपविज्ञान त्याकाळी विकसित होत होते. भूतुकडय़ांच्या सीमांत भागातच प्रकर्षाने भूकंप निर्माण होतात या निष्कर्षाप्रत ते विनासायास पोहोचले होते. याला कारण जे काही भूकंप निर्माण होत होते त्यांची व्याप्ती भूतुकडय़ांच्या अवतीभोवती पसरलेली होती. हे तथ्य लक्षात यायला फार मोठा कालावधी लागला नाही. पण भू तुकडय़ांच्या सीमांत क्षेत्राच्या अगदी आत त्या भूतुकडय़ांच्या मध्यावर भूकंपाची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे जे संशोधक भूकंपाचा अभ्यास करायचे त्यांनी भूतुकडय़ांच्या मध्यावर भूकंप होणार नाहीत असे धाडसी विधान करायला सुरुवात केली, पण असे धाडसी वक्तव्य करणा-या वैज्ञानिकांना कोयना भूकंपाने तोंडघशी पाडले. नंतर इतरही अनेक भूकंप मध्यावर होत राहिले. या सा-या भूकंपात एक समानता लक्षात येऊ लागली. या भूकंपाच्या केंद्रकाजवळ धरणे होती. कोयनेचा धरणीकंप तिथले धरण बांधल्यानंतर झाला, हा एक योगायोग होता की खरोखरच या धरणाचा यात हात होता. याबद्दल अनेक तर्कवितर्क सुचवले जाऊ लागले. त्यानंतर याचा शोध घेण्यासाठी अनेक शोध मोहिमा राबवल्या गेल्या. भू-हालचालींचा ताण अत्र तत्र सर्वत्र पद्धतीने कोयनेच्या परिसरातसुद्धा पडलेला आहे व पडतो आहे. हा जो दाब सातत्याने पडतो आहे, त्याने इथली जमीन अनेक छोटया-मोठया रेषेत दुभंगलेली व भेगा पडलेल्या अवस्थेत आहे. भूकंपात जिथे विभंग असतात, तिथे जमिनीचा तुकडा खाली खचतो. असे ज्यावेळी होते, त्यावेळी जमीन तुटण्याच्या क्रियेमुळे निर्माण झालेली ऊर्जा सर्व दिशांना पसरते. आपण ती भूकंपाच्या रूपात अनुभवतो. जेव्हा कोयना परिसरातील भूकंपांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली, तेव्हा पाण्याच्या साठयाशी एक परस्परसंबंध लक्षात आला. जसजसा पाण्याचा साठा वाढत जातो, तसा तसा भूमी कंपनांचा जोरही वाढत जातो. पाण्याचा साठा कमी झाल्यानंतर भूमी कंपनेही कमी होतात.

आता रहस्य हे आहे की इथले भूकंप साठलेल्या पाण्यामुळे होतात की आधीच दुभंगलेल्या जमिनीमुळे होतात याबाबत वैज्ञानिकांत एकवाक्यता नाही. फक्त धरणामुळे हे भूकंप होतात या समजुतीला कवटाळून राहण्यात काही अर्थ नाही. इथली भू-संरचना विशिष्ट प्रकारची असल्याकारणाने भूकंपाची शक्यता नाकारता येणार नाही, पण ज्या गतीने भूतुकडय़ांच्या सीमांत भागात भूकंपने होतात त्या गतीने इथे निश्चितच होणार नाहीत. पाण्याच्या साठयाचा व भू-संरचनेचा एकत्रित परिणाम म्हणून कोयनेच्या परिसरात भूकंप निर्माण होतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..