सॅल्युट
आजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. […]