नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

फ्लोटिंग स्कुल – तरंगणारी शाळा

आज सुमारे 10 वर्षांनंतर सुद्धा ब्राझील सफरीवरील अमेझॉन नदीची विशालता तिचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सृष्टी आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ऑब्रिगडो म्हणजे धन्यवाद आणि अमिगो म्हणजे मित्र हे दोन पोर्तुगीज शब्द पण कायम लक्षात राहिलेत. […]

फ्लोटिंग आईस – तरंगणारा बर्फ

बोटीवरच्या आयुष्याची ही रंजक सफर आपल्याला करुन देत आहेत मरीन इंजिनिअर प्रथम म्हात्रे. मर्चंट नेव्हीमध्ये असलेले म्हात्रे हे मुंबईकर. गेली अनेक वर्षे सागरसफर करताना आलेले त्यांचे हे अनुभव. […]

आपली ती श्रद्धा आणि दुसऱ्यांचा तो दिखावा

गावात तेव्हा मोजक्याच घरांमध्ये गणपती असायचे दीड दिवसाचे दहा पंधरा, पाच दिवसाचे तीस ते पस्तीस आणि दहा दिवसाचे दहा पंधरा गणपती. एकवीस दिवसांचे एखादं दुसरे. मूर्ती लहान असो की मोठी असो महाग असो की स्वस्त असो घेणारा प्रत्येक जण श्रध्देने ती मूर्ती घरात स्थापन करतो. भक्तिभावाने आणि आत्मीयतेने कुटुंबासोबत गणपतीची आराधना आणि पूजा अर्चा करतो.  […]

दी मोस्ट स्पोकन लँग्वेज

शाळेत असताना आणि नंतर कॉलेज मध्ये गेल्यावर पण जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे इंग्रजी आहे असा समज होता. पण नंतर नंतर जहाजावर असताना ब्राझील, रशिया, युक्रेन, इस्रायल आणि युरोपियन देशांमध्ये जहाजं किनाऱ्याला लागल्यावर बाहेर फिरायला गेलो की इंग्रजीला किती किंमत आहे ते कळून चुकायचे. नंतर नंतर स्पॅनिश ही भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते असे कानावर यायचं आणि इंग्लिश चा नंबर तिसरा का चौथा लागतो असे सांगितले जायचे. पण हल्ली गूगल सर्च केले की जगात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ही चायनीज आहे त्यापाठोपाठ स्पॅनिश मग इंग्रजी मग हिंदी, अरबी आणि बंगाली असा काहीसा क्रम दाखवला जातो. […]

वाहन उद्योगाला मंदी आली ???

ज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत […]

राब

केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]

बाव (विहीर)

आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..