नवीन लेखन...
Avatar
About मुकुंद कर्णिक
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय पाचवा – संन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी संन्यासयोग नावाचा पांचवा अध्याय. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौथा – ज्ञानकर्मसंन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा चौथा अध्याय. […]

हवालदाराची खेळी (कथा)

उत्तर कोलकात्यातील बारासात गाव. बिल्डिंग ब्लॉक्स फॅक्टरीतला कामगार बिधन पाल त्याच्या घरात जेवणाच्या खोलीत बसला होता. पारुलचं, म्हणजे त्याच्या बायकोचं जेवण संपलं नव्हतं. थंडगार पडलेल्या जेवणाचं ताट तसंच टेबलावर होतं, पण ती जागेवर नव्हती. बिधननं तिच्या ग्लासातलं पाणी पिऊन पालथ्या पंजाने ओठ पुसले आणि आरोळी दिली, “पारो, ये बघू आत आता आणि जेवून घे……ए, पारो, ऐकलंस का? चल ये नाही तर मी दार बंद करून टाकीन आणि तू राहशील बाहेर.” […]

सौदा (कथा)

नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.) […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय तिसरा – कर्मयोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय. अर्जुन उवाच । ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ अर्जुन म्हणाला‚ “कर्मापेक्षा श्रेष्ठ बुध्दि हे तुझेच म्हणणे ना ? तरि युध्दाच्या घोर कर्मी मज लोटिशी‚ जनार्दना ? १ […]

वीस वर्षांनंतर (कथा)

बीटवरचा हवालदार मोठ्या तत्परतेनं आपलं ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चं काम बजावत रस्त्यावर गस्त घालत होता. त्याची ही तत्परता कोणाला दाखवावी म्हणून नव्हती हे नक्की ! कारण रस्त्यावर रहदारीच नव्हती. रात्रीचे दहाच वाजत आले होते. पण कडाक्याची थंडी आणि बोचरं वारं या दोघांनी मिळून लोकाना घराबाहेर पडण्यापासून परावृत्त केलं होतं हे खरं. […]

श्रीमद्भगवद्गीता – अध्याय दुसरा – सांख्ययोग

अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय  सञ्जय उवाच । तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः  ॥१॥                 अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन     १ श्रीभगवानुवाच । कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन       […]

श्रीमद्भगवद्गीता – अध्याय पहिला – अर्जुनविषादयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय […]

‘श्रीमद्भगवद्गीता’ समजेल अशा मराठीत श्लोकबद्ध

ख्रिस्तपूर्व ३१०२ या वर्षात कुरूक्षेत्रावर महाभारत युध्द सुरू होण्याच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनावर स्वकीयांवरील प्रेमापोटी मळभ आले. ते मळभ दूर सारून त्याला पुन्हा क्षात्रधर्मानुसारचे आपले कार्य करायला उद्युक्त करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णानी त्याला रणभूमीवर केलेला उपदेश‚ आणि त्या अनुषंगाने अर्जुनाला आलेल्या शंकांचे निरसन करावे म्हणून सविस्तर सांगितलेले ज्ञान‚ यातून हा गीतोपनिषदाचा ग्रंथ बनला आहे जो ‘श्रीमद्भगवद्गीता’ अथवा सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो. आजच्या प्रचलित मराठी बोलीत रूपांतर केलेली गेय स्वरूपातली गीता लोकाना समजणे सोपे जाईल अशी प्रामाणिक मनोभावना यामागे आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..