नवीन लेखन...

पेसमेकर

हृदयाच्या ठोक्यांची गती नियमीत करणे हे पेसमेकरचे कार्य असते. आधुनिक पेसमेकरचे बाहेरुन प्रोग्रॅमिंग करता येते. अशा काही यंत्रांमध्ये पेसमेकर व डिफायब्रिलेटर यांचा समन्वय असतो. हृदयाच्या खालच्या चेंबरचे कार्य सुधारण्यासाठी जास्त इलेक्ट्रोडच्या पेसमेकरचा वापर केला जातो. […]

ब्रेन मॅपिंग

एखाद्या आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते, तिचा शोध मेंदूच्या आरेखनातून घेण्याचा प्रयत्न ब्रेन मॅपिंग चाचणीत केला जातो. या चाचणीला पी-३०० असेही म्हणतात. […]

लाय डिटेक्टर

लाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र असते. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते. […]

ब्लड प्रेशर मॉनिटर

ॲ‍नरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात. […]

डिजिटल थर्मोमीटर

घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटर इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली  याने पहिला थर्मोमीटर  तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव  होते. तो फार अचूक नव्हता.  अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला. […]

नार्को ॲ‍नालिसिस

या औषधांमुळे चेतासंस्था काही काळ काम करेनाशी होते व रक्तदाब कमी होतो. हृदयाचे ठोके कमी होतात. डॉक्टरांच्या उपस्थितीत ही चाचणी केली जाते. त्याचे व्हिडिओ व ऑडिओ चित्रण केले जाते. शासकीय रुग्णालयातच ही चाचणी करावी लागते. या चाचणीला ट्रुथ सिरम टेस्ट असेही म्हणतात, त्यात आरोपीला अर्धवट बेशुद्ध करून माहिती काढली जाते. […]

प्राण्यांचं स्थलांतरण

मानवाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी राहायला आवश्यक जमीन, उद्योगधंद्यांना आणि इतर कामासाठी लागणारी जमीन, या वाढीव लोकसंख्येला पुरविण्यासाठी पिकवाव्या लागणाऱ्या अन्नासाठी आणखी जमीन, असा हा जमिनीवर अधिकाधिक अतिक्रमण करणारा विकास प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरत आहे. […]

कसरत करणारा विदूषक

खेळण्याला असलेल्या विद्युतघटातून (बॅटरी) जोपर्यंत विजेचा पुरवठा सुरू असतो, तोपर्यंत हा विदूषक सतत हालचाल करीत राहतो. […]

अंगावरची यंत्रं

सुरुवातीला संगणक प्रचंड मोठा होता, मोठमोठ्या खोल्या भरून जायच्या, त्यानंतर तो टेबलावर आला, नंतर तो मांडीवरचा संगणक बनला, मग हातात मावेल एवढा छोटा झाला; आणि आता तर तो आपल्या अंगावर मिरवायला लागलाय. आपली महत्त्वाची कामे असोत, आपल्या ज्ञानात वृद्धी करायची असो, की आपले मनोरंजन करायचे असो, हे सगळे आता ही संगणकावरील आधारित अंगावरची यंत्रं करताहेत. यांचीच माहिती देतोय हा लेख… […]

पोस्टकार्डातून विज्ञान

प्रा. जयंत नारळीकर हे लोकप्रिय वक्‍ते आहेत. त्यानिमित्त त्यांचा महाराष्ट्रभर संचार सुरू असतो. भाषण संपल्यावर अनेक विद्यार्थी नारळीकरांची स्वाक्षरी मागायला यायचे. या विद्यार्थ्यांना नाराज न करता, त्यांनी नारळीकरांना पोस्टकार्ड पाठवून प्रश्न विचारावा, त्याला नारळीकरांच्या स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेले उत्तर मिळेल, त्याखाली स्वाक्षरी असेल, असा पर्याय दिला. त्याला जो प्रतिसाद मिळाला, त्यातील निवडक प्रश्न व त्यांची नारळीकरांनी दिलेली […]

1 23 24 25 26 27 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..