नवीन लेखन...

पेसमेकर

हृदयाचे ठोके अव्याहतपणे पडत असतात, तोपर्यंत आपल्याला त्याचे महत्व जाणवत नाही पण जेव्हा ही धडकन थांबते तेव्हा एक जीवन थांबते. हृदयाला धडकण्यासाठी विद्युत्प्रेरणा मिळत नाही त्यामुळे ठोके अनियमीत पडतात.

या समस्येवर उपाय म्हणून पेसमेकर कृत्रिमरित्या तयार करण्यात आला. हृदयाच्या ठोक्यांची गती नियमीत करणे हे पेसमेकरचे कार्य असते. आधुनिक पेसमेकरचे बाहेरुन प्रोग्रॅमिंग करता येते. अशा काही यंत्रांमध्ये पेसमेकर व डिफायब्रिलेटर यांचा समन्वय असतो. हृदयाच्या खालच्या चेंबरचे कार्य सुधारण्यासाठी जास्त इलेक्ट्रोडच्या पेसमेकरचा वापर केला जातो.

१८९२ मध्ये ह्युगो व्हॉन झिमसेन यांनी कॅथरिना सेराफिन या महिलेवर अशा प्रकारे इलेक्ट्रिकल इंपल्सचा वापर केला. १८९९ मध्ये जे. ए. मॅकविल्यम यांनी याबाबत आणखी प्रगत असे प्रयोग करुन त्याची माहिती ब्रिटीश मेडिकल जर्नलला दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील डॉ. मार्क सी. लिडवेल व एडगर बूथ या दोन डॉक्टरांनी पोर्टेबल पेसमेकर यंत्रणा तयार केली.

१९३२ मध्ये अमेरिकी डॉक्टर अल्बर्ट हायमन यांनीही असेच इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्र तयार केले होते. त्याला त्यांनी आर्टिफिशियल पेसमेकर असे नाव दिले व तेच पुढे कायम राहिले. त्यानंतर कॅनेडियन इलेक्ट्रिकल इंजिनियर जॉन हॉप्स, पॉल झोल, डॉ. विल्यम वेरिच यांनीही असेच प्रयोग केले. त्यानंतरच्या काळात ट्रांजिस्टरचा शोध लागला व पेजमेकर अधिक सुटसुटीत आकारात तयार करता आला.

माणसाच्या शरीरात बसवता येईल असा पहिला पेसमेकर स्वीडनमध्ये तयार करण्यात आला.  हा पहिला पेसमेकर बसवलेल्या व्यक्तीचे नाव होते अर्नी लारसन. त्यांना एकूण २६  पेसमेकर त्यांच्या आयुष्यात बसवावे लागले होते.

पहिला व्यावसायिक पेसमेकर सिमेन्स कंपनीने १९५८  मध्ये तयार केला होता.

पेजमेकर मध्ये बॅटरी व सेन्सर्सयुक्त वायर असतात ज्यांना इलेक्ट्रोड म्हणतात. पेसमेकर हृदयाचे ठोके नियमित करतो,  ठोके अयोग्य पडत असतील,  तर त्यातील संगणक संदेश पाठवून जनरेटर कडून इलेक्ट्रिकल पल्स पाठवायला सांगतो. आधुनिक पेसमेकर मध्ये रक्ताचे तपमान, श्वसन व इतर घटकांची नोंद ठेवली जाते.  सिंगल चेंबर पेसमेकर हा उजवी व्हेन्ट्रिकल व जनरेटर यांचा संबंध प्रस्थापित करतो, ड्युअल चेंबर पेसमेकरमध्ये उजवीकडील  अट्रिअम व राईट व्हेन्ट्रिकल तसेच जनरेटर यांच्यात संबंध प्रस्थापित होतो. बायव्हेन्ट्रिक्युलर पेसमेकरमध्ये ॲ‍ट्रियम व दोन्ही व्हेन्ट्रिकल जनरेटर यांच्यात संदेश पाठवले जातात. हृदयाचे ठोके अनियमित असतील तर अहरिथमियस हा रोग होतो, त्यावेळी पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकरच्या किमती तुलनेने खूप जास्त म्हणजे ३० हजार ते ५ लाखापर्यंत असतात.

संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’  या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..