जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

नोटाबंदी निर्णयाचे उचित पाऊल !  

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील चलनात असलेल्या रुपये ५०० आणि १०००च्या नोटा अधिकृत चलनातून रद्द करून जो धाडसी निर्णय घेतला त्याचे सर्वच स्थारातून सकारात्मक स्वागत आणि अभिनंदन होत आहे. देशातील भ्रष्टाचार आणि अन्य मार्गाने मिळविलेल्या काळा पैसा उघड होऊ लागला आहे. देशातील भ्रष्टाचार, काळाबाजार आणि काळा पैसा यांचा नायनाट करण्याचा पंतप्रधानांनी जणू पणच केला […]

चलनी नोटांची काळजी

काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या १००० आणि ५०० रूपयांच्या चलनी नोटा ३० डिसेंबर २०१६ नंतर बंद होणार आहेत. त्यामुळे आता १००० आणि ५०० रूपयांच्या जून्या नोटा यापूढे चलनात राहणार नाहीत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री हा निर्णय जाहीर केला. आता २००० आणि […]

जर्मनीतील निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे….

दहशतवादी कुठल्याही विशिष्ट आकाराने, वेषाने समोर येत नसतो. दहशतवाद्यांनी स्वत:चे लष्कर, नौदल वा वायुदल उभारलेले ऐकिवात नाही. त्यांचे गट अनेक देशांत अनेक हितसंबंधीच्या मदतीने काम करत असतात. त्यांची अशी लिखित/अलिखित घटना नाही. विचारसरणी नाही. अशा सर्वव्यापी, म्हटल्या तर अदृश्य, म्हटल्या तर दृश्य शक्तीच्या विरोधात काही देशांनी जागतिक युद्ध पुकारले आहे. दहशतवादी गटांबरोबर चर्चा, वाटाघाटी, करार शक्यच […]

मातृभूमीच्या शूर जवाना तुला सलाम !

मातृभूमीच्या शूर जवाना स्वातंत्र्या आधी आणि नंतर आमच्यासाठी किती खस्ता खाल्यास याचा इतिहास विसरलो नाही आम्हीं ! मातृभूमीच्या शूर जवाना आप्तांसाठी ऊन, पाऊस, बर्फाच्या वादळात सीमारेषेचे डोळ्यात तेल घालून चोवीस तास राक्षण करतोस ! शत्रूने केलेल्या मातृभूमीवरील भेकड हल्याचे सर्जिकल स्ट्राईकने चोख उत्तर देतोस आपल्या आप्तांचे रक्षणकरण्या वीर मरण पतकरतोस ! मातृभूमीच्या शूर जवाना तुझा जागता […]

आदर्श आई आणि मुलगी

|| हरी ॐ || आदर्श आई आणि मुलगी (सौ. नीलिमा आणि सौ. धनश्री प्रधान) ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात सौ. धनश्री प्रधान दामले यांचे साम टीव्हीच्या सुगरण या कार्यक्रमात दोन रेसिपीज आमच्या बघण्यात आल्या. रेसिपीज छानच होत्या. पण मनात कुठेतरी प्रधान म्हंटल्यावर मला तुमच्या धनश्रीची आठवण झाली. कारण फेसबुकच्या एका फोटोत तुमच्याबरोबर तिचा फोटो बघितल्यासारखा वाटला पण नक्की […]

सभानता

नुकताच आपण सर्वांनी गणपती उत्सव मोठया आनंदात साजरा केला. दरवर्षी पेक्षा ध्वनी प्रदूषण कमी झाले असे म्हणावयास लागेल. मुंबईतील सर्व श्रीगणेशउत्सव मंडळांचे अभिनंदन. परंतू खेदाने म्हणावयास लागेल की पुनार्मिलापाच्या वेळी निघालेल्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण जरा जास्त होते कदाचित बेंजोमुळे असेल. पुढच्यावर्षी यात नक्कीच सुधारणा होईल अशी आशा आहे. असो. आज अश्विन प्रतिपदा, आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला […]

वंदू तुजला गणराया !

हे मयुरेश्वर, श्रीसिद्धिविनायक हेरंभ, लंबोधर शुभाय प्रगटलास विविध रुपा धरणीवर ह्या तुझ्या कृपेचा आशीर्वाद द्याया वंदू तुजला प्रथपुजीताय !   बल्लाळेश्वर, वरदविनायक रूप तुझे मोहक सुंदर तुंदिल शोभे लंबोधर तुझीया दर्शना चिंता-कष्ट दूर वंदू तुजला गणाध्यक्षाय !   चिंतामणी, गिरिजात्मक आम्हीं तुझी बालके अडाणी बोबडे बोल, आमुची वाणी शहाणे करण्या सत्वर येशी भक्ती-सेवेत आम्हां गुंतवीशी वंदू […]

वरिष्ठ नागरिक बचत योजना – २००४

बऱ्याच वर्षांपासून काही मंडळी पैश्याच्या हव्यासापोटी रक्कम दुप्पट, तिप्पट होण्याच्या फसव्या जाहिरातीच्या आमिषांना बळी पडून कुठेही आपली कष्टार्जित पुंजी भविष्यातील सुरक्षितेचा विचार न करता गुंतवणूक करतांना आढळतात. तरी मित्रांनो पैशाची गुंतवणूक करतांना जरा जपून ! आपल्याला देशात पैशाची बचत आणि गुंतवणुकीचे विविध मार्ग उबलब्ध आहेत जसे बँकांतील बचत ठेवी, पोस्टातील ठेवी, शेअर्स, सोने-चांदी, रत्ने, रिअल इस्टेट […]

औचित्य जागतिक मराठी भाषा दिनाचे!

कविवर्य श्री विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे घोषित केले आणि जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेत हा दिवस आपण ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो. समस्त मराठी जनांना ‘जागतिक मराठी भाषा दिवसाच्या’ हार्दिक शुभेच्छा..! भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच […]

सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्याकाळी म्हणजे साधारण इ.स.पू. ९०० मध्ये लढताना एखादा भाल्याचे […]

1 2 3 4 5 6 23
error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....