नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

आऊ यांग्लिनची अग्नी परीक्षा !

दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ नाईक यांनी उलगडून दाखविलेला क्लेशदायक पण जिद्दी जीवनपट वाचण्यात आला. असे खडतर जीवन अश्या कोळ्या वयात कोणावरही येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. एवढया छोटया मुलामध्ये एवढी समज, एवढे धारिष्ट फक्त तोच एक देऊ शकतो. कारण वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या वडिलांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून झालेला अपघात, त्यात […]

महिलांना संरक्षण दलात अनेक संधी !

आपला शेजारील देश पाकिस्तान आणि चीन त्यांच्या कुत्सित स्वभाव प्रमाणे आपल्या सीमा वाढविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुपत्या आणि खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. घुसखोरीची एकही संधी जाऊ देत नाहीत. पाकिस्तान तर नेहमीच अतिरिकी घुसवून सीमांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करताना आपण बघतो. चीननेतर अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूभाग असल्याचे सांगून त्यावर कित्येक वेळा हक्क सांगितला आहे. अश्या सर्व कृरुबुरींवर […]

धूर आणि कानठळ्या बसवणारा आवाज म्हणजे दिवाळी का?

भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या. त्यांचा प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटत असे. त्यापासून कमी उष्णता उत्सर्जित होत असे. दिवाळीत रांगोळी भोवती पणत्या लाऊन […]

प्रदूषण प्रकाशाचे !

वसुंधरेवर मानव जन्माआधी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण अस्तित्वात नसावे. मानव जन्मानंतरही काही युगं कदाचित सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने विरहीतच गेली असतील. कालांतराने मानवांची लोकसंख्या वाढत गेली आणि मानवाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजाही वाढत गेल्या. मानवाने आपल्या बुद्धीच्याबळावर विज्ञान तंत्रज्ञान विकसित केले आणि नवनवीन शोध लावले. मानवाकडे असलेल्या अतृप्ती, असमाधान, लोभ, स्पर्धा, दुर्गुणांमुळे त्याने वसुंधरेवरील सर्वच खजिन्यांचा आणि स्त्रोतांचा […]

महापालिका आणि प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का?

मुंबईत जागांचे भाव एवढे कडाडले आहेत आणि त्यावर पालिकेचा ना प्रशासनाचे नियंत्रण आहे ! एखादी वन-रूम किचन किंवा वन-बीएचके जागा घ्यायची म्हंटले तरी सहज ७० ते ८० लाख रुपये मोजावे लागतात आणि ते सुद्धा जुन्या बिल्डींग मध्ये. सध्यातर मुंबईत वन-रूम किचन किंवा वन-बीएचके फ्लॅट बिल्डर मंडळी बांधतच नाहीत तर विकत घेणार कुठून? बरं जागा बघण्यास गेलो की […]

काळाआड गेलेली लाकडाची खेळणी…!

महाराष्ट्रात कोकण जसा खाद्यपदार्थांसाठी जितका प्रसिद्ध आहे तितकाच लाकडी खेळणी निर्मितीसाठीही आहे. कोकणातील सावंतवाडी आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथे ही लाकडी खेळणी तयार केली जातात. सावंतवाडी या शहरात लाकडी वस्तू खूप चांगल्या आणि वाजवी दरात मिळतात. पालकांनी लाकडी खेळण्यांना प्राधान्य दिल्यास देशात मुख्यत्वे महाराष्ट्रात तरी नवीन झाडे लावली जातील आणि पर्यावरणाचा तोल सांभाळा जाईल अशी आशा आहे. […]

मेघांनो पहा एकवार वळून !

मेघांनो पहा एकवार वळून, हातचे काही राखू नका, कोसळताना अडखळू नका, झेपावताना लाजू नका, पडतांना ‘धड-पडू’ असे करू नका, आनंदाने बरसा, मनापासून बरसा ! तुमचा वर्षाव निरंतर सर्व जिल्ह्यांवर, का रे मेघांनो नाराज असे मराठवाडा-विदर्भावर ! एवढं निष्ठुर झालात तुमच्या आईवर, किती विश्वास ठेवला तुमच्यावर ! किती चटके सोसले तिने तुमची वाट पाहून, बळीराजाला समजावता ती […]

नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरचे पुनर्वसन

नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या क्लिप्स आणि बातम्या बघितल्याने अंगावर काटा उभा राहीला. भूकंप होण्यामागची काही करणं आपण थोडक्यात बघणार आहोत. खाणकाम हे प्रमुख मानले जाते. काही देशांमध्ये कोळसा, अ‍ॅल्युमिनियम, पेट्रोलियम पदार्थ, ग्रेनाइड आणि अन्य काही खनिज पदार्थांसाठी उत्खनन केले जाते. यासाठी मोठे स्फोट घडविले जातात. उत्खननामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी भूगर्भात तीव्र कंपने होतात. स्फोट हे […]

श्रावण मनभावन !

सण उत्सवाने भरलेला श्रावण, चैतन्याने, आराधनेने भरलेला श्रावण, सृष्टीच्या नटण्या मुरडण्याचा श्रावण, ऊन-पावसाशी लपंडाव खेळणारा श्रावण, श्रावण मनभावन ! देवदेवतांच्या भजन-पूजनात रंगून जाण्याचा श्रावण, व्रतवैकल्याने, धार्मिक परंपरेने आत्मबल वाढवणारा श्रावण, चांगुलपणा, भाविकता आणि भावुकता जागवणारा श्रावण, माणसांना खुलवणार, नाचवणारा, गाणारा श्रावण, श्रावण मनभावन ! नागपंचमी, जन्माष्टमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, मातृदिन आणि पोळ्याचा श्रावण, तरुणी, नाविवाहीतांचा, मंगळागौरीचा श्रावण, […]

1 4 5 6 7 8 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..