जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

सुगंधी शेती !

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व जगात हवामानाचे अंदाज चुकत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा असे आपल्याला दरवर्षी अनुभवास येते. आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यावर मात करण्यासाठी पारंपारिक शेती सोडून काही नवीन मार्ग शेतकरी बंधू शोधू लागले आणि त्यात त्यांना यश येऊन त्यांनी सुगंधी तेल मिळणाऱ्या गवताची शेती करण्यास सुरवात केली […]

देशापुढील ई-कचऱ्याची गंभीर समस्या

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत होती. आगीने रौद्र रूप धारण करण्याची कदाचित बरीच करणे असतील. मुळात कचराच होऊ नये म्हणून बऱ्याच योजना आखण्यात आल्या आहेत पण देशातील नागरिक मनापासून त्यांच्या कृतीतून अंमलबजावणी करताना दिसत नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस सगळ्याच प्रकारच्या कचार्यांची समस्या देशापुढे गंभीर रूप धारण करीत आहेत. अश्याच देशापुढील ई-कचऱ्याच्या समस्येबद्दल […]

चुका आणि खिळ्यांचे मनोगत

खिळ्यांचे जगही असेच असते, चुकांमधून सुधारत असते ! लहान खिळ्यांना चुका म्हणतात, चुकता चुका खिळे होतात ! चुकांचे सुद्धा किती प्रकार, टेकस, छोटेखिळे विविध आकार ! लहान खिळ्यांना चुका म्हणण्याचे कारण काय? खिळे बनवितांना चुका झाल्या काय? चुकल्या चुका, नादावले खिळे, चुका आणि खिळ्यांच्या नशिबी हातोडे ! रुसल्या चुका, रुसले खिळे, लाकडात शिरण्या नाही रुचे ! […]

दशावतारी पेन्शन !

एकंदरीतच वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. आपल्या देशात आई-वडिलांना देवासारखा मान दिला जातो. पण काही घरात त्यांना अगदी परक्या सारखी वागणुक दिल्याचे बघुन मन अस्वस्थ होतं. खरच आपण इतके निष्ठूर, बेजबाबदार, असहीस्णू, कठोर, दगडाच्या काळजाचे झालो आहोत का? ज्या आई-वडिलांमुळे देवाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघण्याचे भाग्य लाभले. तेच आई-वडिल आपल्याला जड व्हावेत यासारखे […]

भविष्यातील उर्जेचा पर्याय – सौरउर्जा..!

मानवाच्या वाढत्या गरजा, चैन, भोगवाद, चंगळवाद आणि जगण्याच्या नाना तऱ्हा तसेच वाढलेल्या सत्ता स्पर्धा त्यातून निर्माण झालेले कलह, लढाया आणि त्याला तोंड देता देता पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भविष्यात आरोग्याच्या चिंता निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत. मानवाला आपल्या दैनदिन जीवनात रोज कुठल्या ना कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यातून वाढलेली महागाई, रोज नव्याने भेडसावणारे विजेचे आणि पावसाचे संकट. […]

लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मुत्राचा निचरा

सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे. रोज सकाळी रेल्वेच्या बऱ्याच ट्रॅकलगतच्या जागेत केले जाणारे प्रातर्विधी बद्दल न बोलणेच बरे. तसेच चालत्या आणि स्टेशनमध्ये थांबलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मूत्राच्या होणाऱ्या निचऱ्याने स्टेशन आणि आसपासचा परिसर दुर्गंधीयुक्त […]

न समजलेले नागरिक-शास्त्र

लहानपणी प्रत्येक मुलाचे काही ना काही स्वप्न असते. कोणाला डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. वकील, आर्किटेक तर कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असत. स्वप्न नक्कीच चांगलीच आहेत पण तरीही कोणाला देशाचा चांगला नागरिक, चांगले आई-बाबा, पालक व्हावेसे वाटतेच ना? प्रत्येकाने स्वत:च्या आंतरमनात शिरून विचार करावा की मग असे लक्षात येईल की या सगळ्या स्वप्नांतून मी नक्की काय प्राप्त केले? मला […]

लोकल ट्रेनमधील अपघातांच्या निमित्ताने !

माणसाला वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोज कुठल्याना कुठल्या वाहनाने प्रवास हा करावाच लागतो. मग तो सायकल, स्कूटर, मोटार, बस, बोट-होडी, रेल्वे किंवा विमान असो. प्रवास करतांना अपघात होतात म्हणून प्रवास करण्याचे टाळता येत नाही. मुंबईच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात रेल्वे ही आपल्या दैनंदिन जीवनाचा खुप मोठा हिस्सा बनली आहे. रोजची गर्दी, डब्यातील भांडणं आणि मार्‍यामार्‍या या सगळ्यांमुळे […]

शून्य कचरा परिसर !

सध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्यावर आहे आणि त्यात रोज वाढच होत आहे त्यात दररोज जमा होणारा कचरा कित्येक मेट्रिक टन आहे. तसेच सातत्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, गृहसंकुलं त्यामुळे त्यात होणारी कचऱ्याची वाढ, त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी होणारा कैक कोटींतील खर्च, डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्या, ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरील तोकडे उपाय अश्या सगळ्यातून मार्गक्रमण […]

भावंडे जुळी दोन

देवाने दिली आपणास बाळे जुळी दोन, पाठीला पाठ लाऊन जन्मास आली जणू एकाच नाण्याच्या बाजू दोन ! एक बहिण आणि एक भाऊ नामकरण करती त्यांचे तृप्ती आणि समाधान ! जुळ्यांना समजावून घेतना होते मनाची कसरत, मीमी तूतू ने गाडी नाही पुढे सरकत ! प्रेम करता एकावर रुसवे दुसरे उगाच, दुसऱ्यास जवळ घेता पहिले पाहे रागेच ! […]

1 3 4 5 6 7 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..