नवीन लेखन...

जागतिक मैत्री दिवस

मैत्रीच्या नात्यामध्ये असणारी व्यक्ती ही आपल्या निवडीवर अवलंबून असलेल्या काही व्यक्तींपैकी एक असते. त्यामुळे मैत्री, जिव्हाळा जपण्यासाठी वर्षातले काही दिवस खास असतात. दरम्यान जगभरात दरवर्षी ३० जुलै हा दिवस जागतिक मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये अनेक वर्षांपासून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. दक्षिण आफ्रिकेत १९५८ मध्ये आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा […]

हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे

हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला. वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे […]

हालोबाचा माळ…

आमच्या बालपणी कधी आम्ही पिकनीकला गेलो नाही किंवा पर्यटनस्थळाला गेल्याचे फारसे आठवत नाही. अनेक जणांच्या तोंडून पर्यटनस्थळांची वेगवेगळी नावं मात्र ऐकली होती. मेळघाट्,लोणावळा, चिखलदरा,म्हैसमाळ ही नावं ऐकून त्याबद्दल खूप उत्सुकताही वाटायची पण, आमचे फेवरेट पर्यटन स्थळ म्हणजे गावचा हालोबाचा माळ. […]

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ

आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे.  अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच  नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा  स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह ! […]

गृहनिर्माण संस्थेच्या प्रवर्तकांची पहिली सर्वसाधारण सभा

डेव्हलपर त्याच्या डोक्यावरील भार लवकरात लवकर उतरवायला उत्सुक असतो. तर कधी दिलेली आश्वासनं बिल्डरने पूर्ण करत नाही तोपर्यत काही सदस्य संस्थेचा ताबा घेण्यास तयार नसतात. काही संस्थेचे सदस्य आणि बिल्डर याचे वाद कोर्टात प्रलंबित असतात. तर अनेक सदस्यांना प्रश्न असतो, संस्था नोदणी झाली… पुढे काय? नविन संस्था एक इमारत १५० ते २०० त्याहून अधिक सदस्य असल्याने कामाचे स्वरूप सुद्धा वेगळे आणि वाढले आहे. अनेक प्रकारचे करार तपासावे लागतात. तेव्हा अशा स्वरूपाच्या कामाची माहिती असलेला कायदेतज्ञ यांच्या सल्ल्याने कारभार केल्यास सदस्याचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदतच होईल. आजच्या भागात पहिल्या सर्वसाधारण सभेची माहिती आपल्यासाठी. […]

ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र

सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते. […]

जिंदगी धूप, तुम घना साया

१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘चष्मेबद्दूर’ हा हलका फुलका, अप्रतिम चित्रपट आहे. तो अगदी आजही पाहिल्यावर ‘रिफ्रेश’ झाल्यासारखं वाटतं. त्यातील ‘कहासे आये बदरा..’ हे गाणं गाणारी दिप्ती नवल ही अभिनेत्री न वाटता, आपल्या जवळपासच राहणारी साधी मध्यमवर्गीय मुलगी वाटते. […]

मधू आपटे

शांतारामबापूंनी मधू आपटे यांचे बोलणे फोनवर ऐकल्यावर त्यांनी मधू आपटे यांना ‘ संत तुकाराम ‘ या चित्रपटात सालोमालो या इरसाल व्यक्तीरेखेच्या भूमिकेत उभे केले. […]

कवयित्री इंदिरा संत

इंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली. […]

चित्रकार सदाशिव बाकरे

त्यांनी शालेय शिक्षणानंतर १९३९ मध्ये ‘ सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टस् ‘ मध्ये प्रवेश घेतला. तेथे कलेचे शिक्षण घेत असताना त्यांच्या अभ्यासातील उत्तम प्रगतीमुळे त्यांना बहुमानाची ‘ लॉर्ड हार्डिंग्ज ‘ शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्यांना ‘ लॉर्ड मेयो ‘ सुवर्णपदकही देण्यात आले. […]

1 2 3 4 31
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..