नवीन लेखन...

नैवेद्य का दाखवावा ??

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का ? गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ? गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. […]

प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग १

Standerton इथली खेळी संपली!! ती संपत असताना मला प्रिटोरियामध्ये नवीन नोकरी मिळाली होती पण ती join करण्याआधी, मी भारतात सुटीवर यायचे ठरले. येताना, मनात विचार आला, सुटीवर येत आहे तर महिंद्र कंपनीत “खडा” टाकून बघूया!! नाहीतरी महिनाभर तसा  उद्योग नव्हता. महिंद्रने नुकताच साउथ आफ्रिकेत बिझिनेस सुरु केला होता, तेंव्हा त्यांना माणसांची गरज तर लागणारच, असा हिशेब […]

मोहक गारा

“अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग!!” कविवर्य मर्ढेकरांच्या या ओळी म्हणजे “गारा” रागाची ओळख आहे असे वाटते. खरे म्हणजे मर्ढेकरांची ओळख म्हणजे “सामाजिक बांधलकी” जपणारे आणि मराठी कवितेत मन्वंतर घडवणारे कवी. परंतु असे “लेबल” किती एकांगी आहे, याची यथार्थ जाणीव करून देणारी ही कविता!! वास्तविक हा राग तसा फारसा […]

कोणास ठावूक ?

कधी तू ‘शिक्षक ‘असतेस , तर कधी तू ‘शिक्षा ‘ असतेस ! कधी तू खूप ‘दूरची’ भासतेस, तर कधी तू ‘जवळची’ असतेस! बरेचदा तू ‘आई ‘असतेस, पण प्रसंगी तू ‘बाप’ होतेस ! कधी तू ‘असतानाही’ नसतेस, तर कधी ‘नसतानाही’ असतेस ! मला हवी तशी ‘तू’ कधीच नसतेस, म्हणून मग तू फक्त ‘बायको’ होऊन रहातेस ! कधी […]

बाळक्रीडा अभंग क्र.३८

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

रसिक श्रेष्ठ

कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी ।।१।।   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी ।।२।।   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा ।।३।।   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी   […]

देह समजा सोय

जेव्हां मी म्हणतो माझे,  सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात….१,   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे…..२   भजन करा प्रभूचे, सूख देवूनी देहाला परि केवळ सुखासाठीं,  विसरूं नका हो त्याला……३,   देह चांगला म्हणजे, ऐश आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, त्यांने प्रभू मिळवावे…..४ […]

होय, नांदू शकते मराठवाड्यातही संपन्नता !!!

आज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन 70 वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते. […]

बाळक्रीडा अभंग क्र.३७

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते. […]

डर्बन भाग २

डर्बन शहर तसे समुद्र किनारी वसलेले असले तरी उपनगरे मात्र डोंगराळ भागात आहेत. याचा परिणाम असा होतो, मुख्य शहरात डिसेंबर/जानेवारी मध्ये कडाक्याचे उन असले तरी उपनगरी भागात तितका कडाका जाणवत नाही. इथे आणखी एक गन्मात वारंवार बघायला मिळते. उन्हाळ्याच्या महिन्यात समजा सलग ३ दिवस उन्हाची काहिली (मुंबईच्या तुलनेत) झाली तरी ४ थ्या दिवशी हमखास पावसाची सर […]

1 3 4 5 6 7 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..