मागे वळून बघताना……

२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा चालू होता. वास्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून – बोटस्वाना मधून दोन कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा जाणवायच्या. इथे […]

एक विदारक अनुभव

आपल्याकडे एक समज आहे आणि त्याच बरोबर आकर्षण देखील आहे – गोऱ्या लोकांच्या समाजाबद्दल. समज असा आहे, “हे लोक किती श्रीमंत असतात आणि किती सुंदर आयुष्य व्यतीत करतात”!! यामधील, दुसरा भाग बरोबर आहे पण पहिला निश्चितच नाही. आयुष्य कसे उपभोगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठ मला, माझ्या साउथ आफ्रिकेच्या १७ वर्षांच्या वास्तव्यात भरपूर मिळाला. अर्थात, मला भेटलेले […]

साउथ आफ्रिका – जोहानसबर्ग १

जेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही. शहर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वाढलेले आणि वाढवलेले आहे. इथे, […]

साउथ आफ्रिका-शहर जोहानसबर्ग

आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, […]

साउथ आफ्रिका – डर्बन!!

माझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या माझ्या झाल्यादेखील. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, इतिहास हेच सांगतो […]

जेनेट आणि जेम्स!!

२००३ मधील डिसेंबर होता. पीटरमेरीत्झबर्ग मधील उन्हाळ्यातील थंड दिवस होता. सकाळीच माझा मित्र, क्लिफ घरी आला, तो, त्याच्यासोबत त्याची मुलगी जेनेट हिला घेऊनच. क्लिफ हा माझा अतिशय चांगला मित्र असल्याने, आणि त्याच्या घरी माझे नियमित जाणे-येणे असल्याने, आम्ही कधीही एकमेकांच्या घरी जात असू. वास्तविक रविवार सकाळ म्हणजे त्याची चर्चमध्ये जायची वेळ तरीही तो, जेनेटसोबत आला होता, […]

साउथ आफ्रिका – सुरक्षितता आणि मनोरंजन!!

साउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण!! त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते!! मुंबईत रात्री-बेरात्री बाहेर रस्त्यावर पायी हिंडायला काहीच वाटत नाही पण, साउथ आफ्रिकेत […]

रविवार सकाळ!!‏

प्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ!! आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम!! इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे […]

साउथ आफ्रिका संस्कृती(!!)

एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज). अर्थात, माझ्यासारखे नोकरीसाठी येउन स्थायिक झालेले तसे बरेच आहेत पण […]

Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग ३

वास्तविक या गावात मी केवळ २ वर्षेच राहिलो पण, तरीही साउथ आफ्रिकेचा “अर्क” बघता आला!! मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची साधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला!!) वगळता कुठलीच मोठी इंडस्ट्री नसल्याने, रोजगाराच्या संधी तशा फारच कमी. खरतर, आमची बृवरी […]

1 2 3 4
Whatsapp वर संपर्क साधा..