नवीन लेखन...

येरे येरे पावसा

सकाळी उठल्या उठल्या खिडकी उघडून बाहेर डोकावले. आज सूर्य देवाने पडद्याआड रहाणेच पसंत केले होते. काळ्याभोर घनमालांनी दिलासा दिला. ‘होय, तो आज नक्की येणार’. माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. ग्रीष्माच्या भट्टीत होरपळलेली सृष्टीही माझ्यासारखीच अधीर झाली होती. मृगाचे चार दिवस उलटून गेलेत, तरी याच्या येण्याची चाहूल नाही. फक्त जीव गुदमरून टाकणारे वातावरण स्वत:शीच स्पर्धा करीत […]

मराठवाडा – स्वतंत्र राज्य ?

महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्री. श्रीहरी अणे यांनी नुकताच, ‘मराठवाड्याचे वेगळे राज्य व्हावे’ असा विचार मांडला. (त्याआधीही त्यानी, ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे’, असा विचारही मांडलेला आहे). श्री. अणे यांच्या वक्तव्यावर भिन्नभिन्न पक्षांमधल्या विविध राजकारण्यांनी ‘भावनिक गदारोळ’ केला ; इतका की, त्यानंतर श्री. अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. २३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखात, “श्रीहरी अणे यांच्यासारखा […]

मुखवटे (गझल)

भोवती बघतो तिथें दिसतात सारे मुखवटे होय रे, मंचावरी असतात सारे मुखवटे ! बदलतो माणूस वस्त्रें, बदलतो आत्मा कुडी बदलती नेते तसे त्यांच्या मनाचे मुखवटे ।। रौद्र वादळ वा पुराचें चाललें थैमान जे थंड काचेतून बघती थंड उडते मुखवटे ।। रोज जे घेती सुपार्या, निजशिशुस नवनीत ते ओळखा, कुठले खरे ते, आणि कुठले मुखवटे ।। भामट्यांचा […]

अजुनही माणूस तूं

हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं त्याहुनी आश्चर्य आहे – अजुनही माणूस तूं ! राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ? ईश ना शकसी बनूं, सैतान तरि होऊं नको त्यापरी स्वीकार कर हें – अजुनही माणूस तूं ।। कधिच तूं बनलास फत्तर, तरि कधी नयनातलें सांगतें जें […]

मदमत्त मुजोर टगे

मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।। दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।। काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी घर पेटवून द्याया चहुंवर खड्या मशाली ।। माझ्यामुळेच ज्यांचा जगिं मान वाढताहे दाबून ओठ, करतो त्यांचीच मी हमाली ।। मधुनीच हात स्फुरती, पण हाय […]

शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती) लेखक : सुभाष स. नाईक मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते. हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल […]

ही माझी शाळा

आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।।   आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।।   शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे ।।३।। बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।४।।   कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर […]

चक्रव्यूह

ठोका खोकी बनवा खोपी ही झोपडपट्टी गटारावरी भटारखाना आणि हातभट्टी.  ||१|| ओसंडे घन दुर्गंधि-घाण कचरा सडला तिथेच भ्रामक जीवन नामक खेळ मांडला.   ||२|| रोज ठणाणा नविन घोषणा सुधारणांच्या. शून्यें असतीं नांवावरती सरकारांच्या.   ||३|| मंत्री येतां जिवंत प्रेतां बघुन न बघती गोठ्यामधली ढोरें सगळी तशीच ज़गती.   ||४|| चक्रव्यूह रणिं रचला कोणी मुळी न ठाउक […]

जॅक दि जायंट-किलर

उंच उंच आभाळात सरळसोट चढत गेलेला खांब; ढगांना फाडून वरती गेलेला, जादूचा, अर्ध्या रात्रीत उभा झालेला. खांबावर जॅक सरसर चढतो, ढगांच्याही वर, काचेच्या पेंटहाऊसपर्यंत. मऊ मऊ गालिचावर पावलें वाजतच नाहींत, दाणदाण काय, अजिबातच नाहींत. गरम गरम अन्न पुढे येतं, पण जॅकला गिळतच नाहीं. जॅक तसाच उठतो, आणि कुरवाळत बसतो सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. कोंबडीला कुरवाळून, सुरक्षित […]

ढाई अच्छर प्रेम का.. (प्रास्ताविक : ‘प्रीतिगंध’ काव्यसंग्रहाचें)

शिवानी पब्लिकेशनचे श्री. संतोष म्हाडेश्वर यांनी मला ‘प्रीतिगंध’ या शीर्षकाच्या, ‘प्रेम’ या विषयावरील काव्यसंग्रहासाठी प्रास्ताविक लिहायची विनंती केली, आणि मी ज़रा विचारात पडलो. मी कांहीं अनुभवी प्राध्यापक नव्हे, प्रतिथयश साहित्यिक नव्हे किंवा ज्ञानी समीक्षकही नव्हे. साहित्याशी माझा संबंध एक रसिक वाचक व हौशी कवि-लेखक, एवढाच आहे. माझें जीवन गेलें कॉर्पोरेट क्षेत्रात. तें क्षेत्र वेगळें आणि कवितासंग्रहाची […]

1 2 3 4 5 6 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..