नवीन लेखन...

शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती)

लेखक : सुभाष स. नाईक

मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक

अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम
अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।।

अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते.

हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल  त्याबद्दल बरेच लिहिले-बोललेही जाते. पण ६८ टक्क्यांबाहेरील विद्यार्थ्यांबद्दल किती लोक बोलतात ?  तुम्ही विचाराल की, हे ६८ टक्के काय  प्रकरण आहे ?  हा काही  ‘कोटा’ ( quota ) आहे का, ‘एस्.सी. एस्.टी.’  किंवा  ‘ओ.बी.सी.’  सारखा ?  की,  हा  एखादा  ‘कट्-ऑफ पॉइंट’ ( cut-off point )  आहे , ऍडमिशनसाठी ठेवलेला ? तेव्हा, ६८ टक्क्यांमधे नसलेल्यांबद्दल बोलण्याआधी आपल्याला ही ६८ टक्क्यांची भानगड समजून घेतली पाहिजे.

‘६८’ टक्केवाल्यांचे जग :

सर्वप्रथम आपण ‘नॉर्मल’ म्हणजे काय हे समजून घेऊ या. नॉर्मल म्हणजे सर्वसाधारण. नॉर्मल अर्थात  सर्वसाधारण म्हणजे काय ? एखाद्या विशिष्ठ गटातील जास्तीत जास्त गोष्टींचे जे गुणधर्म असतात, ते त्या गटासाठी ‘सर्वसाधारण’ आहेत, असे म्हणता येईल. उदाहरणार्थ, माणूसप्राणी. माणसाला दोन हात, दोन पाय, एक डोके, ताठ उभा राहू शकणारा देह, दहा-दहा बोटे, असे गुणधर्म नॉर्मल म्हणता येतील.  पक्ष्यांचे म्हणाल तर, पंख, चोच, अणकुचीदार पंजे, हे त्यांच्यासाठी नॉर्मल गुणधर्म म्हणता येतील.

त्या विशिष्ठ गटातील एखाद्याचे गुणधर्म जर काही नॉर्मलपेक्षा वेगळे असले, (उदा. दहाऐवजी अकरा बोटे असणे), तर तो ‘नॉर्मलपेक्षा-भिन्न’ (different from Normal) आहे, असे म्हणता येईल.

संख्याशास्त्रात (statistics) ‘नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन’ नावाचा एक फिनॉमेनॉन (phenomernon) आहे. हा फिनॉमेनॉन ‘बेल्-कर्व्ह’ नामक आलेखाने (घंटीच्या आकाराचा आलेख) दाखवता येतो. सरासरीचा बिंदू (mean) हा या आलेखाचा मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला जर ‘एक सिग्मा’ (one sigma) इतके ‘स्टँडर्ड-डिव्हिएशन’ (deviation,तफावत) बघितले, तर त्या ‘रेंज’ (range) च्या अंतर्गत त्या गटातल्या ६८% वस्तू सामावतात ; ‘दोन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९३% , व ‘तीन सिग्मा’ डिव्हिएशनच्या अंतर्गत ९९.७% इतक्या वस्तू सामावतात. सरासरीपासून एक सिग्मापर्यंतच्या सर्व वस्तूंचे गुणधर्म सरासरीपासून फारसे वेगळे नसतात, म्हणजेच जवळजवळ सरासरीसारखेच असतात.

एक सिग्मा ते दोन सिग्मा अंतर पाहिले, तर त्या गटातील गुणधर्म हे सरासरीपासून बर्‍यापैकी वेगळे असतात, ओळखू येण्याइतके वेगळे असतात. दोन ते तीन सिग्मा या अंतरातील गटाचे गुणधर्म सरासरीपेक्षा बरेच दूर असतात, बरेच वेगळे असतात. मघाचे, भारतीय पुरुषांचे उदाहरण उंची हा घटक घेऊन पाहू या, म्हणजे हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. उदाहरणार्थ असे समजू की भारतीय पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ६ इंच आहे. त्याप्रमाणे, साधारणपणे ५ फूट ४ इंच ते ५ फूट ८ इंच उंच भारतीय पुरुष उंचीच्या संदर्भात ‘नॉर्मल’ समजले जातील. समजा, एखादा पुरुष ५’-२” उंच आहे. तो पुरुष ‘थोडा-बुटका’ समजला  जाईल. ५’-१०” उंच असलेला दुसरा एक पुरुष ‘थोडा-उंच’ म्हटला जाईल. पण, एखादा ४’-६” असलेला माणूस ‘खूपच-बुटका’ (अर्थात, नॉर्मलेक्षा खूपच वेगळा) व दुसरा एक ६’-६” उंच असलेला माणूस ‘खूपच-उंच’ या सदरात गणला जाईल (अर्थातच, हाही माणूस उंचीच्या बाबतीत नॉर्मलपेक्षा खूपच भिन्न समजला जाईल). पण असे असले तरी, त्यांचेही इतर गुणधर्म (जसे, दोन हात, दोन पाय इ.), दाखवतात की तीसुद्धा माणसेच आहेत, कारण की त्या दुसर्‍या गुणधर्मांच्या बाबतीत ती माणसेही इतरांसारखीच असतात. भारतीय बायकांच्या बाबतीत उंचीचे नॉर्मस् पुरुषांपेक्षा वेगळे असतील. तसेच पाश्चिमात्यांचे उंचीचे नॉर्मस् किंवा चिनी लोकांचे उंचीचे नॉर्मस् हे भारतीयांच्यापेक्षा वेगळे असतील.

महत्वाची गोष्ट ही आहे की , जगातील गोष्टी ,  या ‘६८%’ म्हणजेच नॉर्मल लोकांसाठीच असतात. उदाहरणार्थ, हॉकी स्टिक. साधारणपणे माणसे उजव्या हाताने काम करणारी (right-handed) असतात. त्यामुळे हॉकी-स्टिक त्यांच्यासाठी डिझाइन केलेल्या असतात. म्हणून, डावखोर्‍यांना (left-handed) त्या वापरतांना त्रास हा होतोच ! जगातील पद्धती (systems), सुविधा (facilities), या ‘६८‘ टक्केवाल्यांसाठीच बनवलेल्या असतात ; आणि उरलेल्या ३२ टक्क्यांना त्याबरोबर जावे लागते. या ३२ टक्क्यांमधेसुद्धा, जो सरासरीच्या जास्त जवळ, त्याला तडजोड/समायोजन (ऍडजस्टमेंट) जास्त सोपे जाते. जो जास्त दूर, (जसे की, ‘दोन सिग्मा’ पेक्षा जास्त स्टँडर्ड-डिव्हिएशन असलेली व्यक्ती),  त्याला ही ऍडजस्टमेंट बरीच कठीण जाते. तरीही त्याला त्या पद्धतीबरोबर (सिस्टमबरोबर) फरपटत जावे लागते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर, इमारतीचे दार जमिनीपेक्षा उंच असल्यास पुढे पायर्‍या असतात. पण मग, लंगडे असणार्‍या व्यक्तींचे काय ? अशा लोकांसाठी किती ठिकाणी उतार (ramp) बांधलेला असतो ?

तुम्ही म्हणाल की, या ‘नॉर्मल’ चा शिक्षणाशी काय संबंध ? याचे उत्तर असे आहे की, शिक्षणाचा आराखडाही ‘नॉर्मल’ लोकांसाठीच बनवलेला असतो. सध्याच्या शिक्षणपद्धतीचा व बुद्धिमत्तेचा संबंध आहे. म्हणून, आपण बुद्धिमत्ता या गुणधर्माच्या संदर्भात ‘नॉर्मल-डिस्ट्रीब्यूशन’ कडे पाहू या. बुद्धिमत्तेचे मापन ‘आय्.क्यू.’ (इंटलिजन्स कोशंट) याने करतात. माणसासाठी, ‘१००’ हा आकडा आय्. क्यू. ची सरासरी (mean) मानतात. ६८% माणसांचा आय्. क्यू. ८५ ते ११५ असेल. या ‘रेंज’पेक्षा अधिक आय्. क्यू. असलेले ‘सबनॉर्मल’ व कमी आय्. क्यू. असलेले ‘ऍबनॉर्मल’ म्हणवले जातील. हे सबनॉर्मल लोक अति-हुशार म्हणून गणले जातात. यांनासुद्धा ऍडजस्टमेंट करायला त्रास होऊ शकतो, व होतोही. जे ऍबनॉर्मल आहेत, त्या आय्. क्यू. कमी असलेल्यांना ‘मेंटली चॅलेंज्ड’ असे म्हणतात. हल्ली त्यांना ‘डिफरंटली एबल्ड’ असे म्हणू लागले आहेत, आणि ते योग्यच आहे. कसे, ते पुढे येईलच.

आपण बुद्धीच्या विषयाकडे नंतर पुन्हा वळू.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..