नवीन लेखन...

गंगा आणि जल (उमा भारती यांच्यासाठी कांहीं माहिती)

२५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा भारती यांनी ( किंवा त्यांच्यातर्फे, त्यांच्या ‘वॉटर रिसोर्सेस’ खात्यानें) सुप्रीम कोर्टाला सांगितलें की, अलकनंदा, भागीरथी व मंदाकिनी या नद्यांवर (हायड्रोइलेक्ट्रिक वीजनिर्मितीसाठी) धरणें बांधणें हें गंगेसाठी घातक ठरेल , नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होईल , आणि अर्थातच, […]

मनी प्रेम कर

तारूण्याच्या उंबरठ्यावरी, ज्योत प्रेमाची पेटून जाते, बाह्यांगाचे आकर्षण परि, वयांत त्या भुरळ घालते ।।१।।   प्रेमामधली काव्य कल्पना, शरीर सुखाच्या नजीक ती, किंचित होतां देह दुर्बल त्याच प्रेमाची घृणा वाटती ।।२।।   प्रेम हवे तर प्रेम कर तूं, मूळे असावी अंतर्यामी, मना मधली ओढ खरी ती, येईल अखेर तीच कामीं ।।३।।   अंतर्मनातील प्रेम बंधन, नाते […]

ये ज़वळ बस (स्मृतिकाव्य)

‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं, मी बसलोही क्षीण तुझा कर करीं घेउनी सुखावलोही . नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू काय व्हायचें होतें ‘उद्या’च येथुन कायमचें तुज दूर ज़ायचें होतें. – – – ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या आठवणीत ) — सुभाष स. नाईक

गाय आणि आपण : काल आणि आज

मे ९, २०१६ च्या लोकसत्ता, मुंबई एडिशनमधील ‘गोवंशप्रतिपालकांचा विजय’ हा लेख वाचला. उत्कृष्ट व्यंग. हे व्यंग आमच्यासारख्या वाचकांना समजलें, पण ज्यांना कळायला हवें, त्यांना तें कळलें असेल काय ? एनी वे, तें जें असेल तें असो, आपण यानिमित्तानें , ‘गाय’ या विषयाची थोडीशी चर्चा करूं या. पुढें जाण्यापूर्वी, मला हें स्पष्ट करणें आवश्यक वाटतें की, एक […]

शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला, थोटके का भासते  । झेप घेण्या पंख फुटतां, हाती येईल काय ते ?।।१।।   उंच हा गिरीराज देखूनी, शिखर चढावे वाटते  । चार पावले टाकतां क्षणी, चढणे सोपे काय ते ? ।।२।।   अथांग सागर खोल जरी , डूबकी घ्यावी वाटते  । जलतरण कला अवगत होता, सूर मारणें जमेल कां ते? ।।३।।   काव्य […]

ब्रेक्झिट आणि केजरीवाल

‘ब्रेक्झिट’साठी जनमत घेतलें गेलें, आणि ब्रिटननें युरोपीय समुदायातून (EU) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तें होतांच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक पुकारा करूं लागले. ब्रेक्झिटचा आणि केजरीवाल यांचा संबंध काय, असा प्रश्न मनांत येणें स्वाभाविक आहे . तो संबंध आहे ‘जनमत’ हा. सध्या दिल्ली हें जरी ‘राज्य’ असलें तरी, तें इतर राज्यांसारखें पूर्णपणें स्वतंत्र राज्य नाहीं ; […]

ब्रेक्झिट आणि राज ठाकरे

आज जगभर ब्रेक्झिटची चर्चा चालू आहे, कारण ग्रेट ब्रिटननें युरोपीय महासंघातून (EU) बाहेर पडण्याचा निर्णय जनमताद्वारें घेतला आहे. आतां, कुणाच्या मनांत हा प्रश्न येऊं शकतो की, याचा राज ठाकरे यांच्याशी संबंध काय ? त्याच्याकडे आपण येणारच आहोत. ब्रेक्झिटबद्दल सगळ्यांना माहीत आहेच. आपणही ब्रेक्झिटकडे एक नजर टाकूं. ब्रिटन ई.यू. मधुन बाहेर पडलें याचें एक मुख्य कारण आहे […]

मेहदी हसन यांच्या ‘रंजिश ही सही’ या सुप्रसिद्ध गझलबद्दल

कांहीं काळापूर्वीच, १३ जून २०१२ ला, मेहदी हसन यांचे निधन झाले. त्यांना ‘शहनशाह-ए-गझल’ म्हणतात ते यथार्थ आहे. त्यांचा नुसता उल्लेख झाला की, त्यांनी गायलेल्या अनेक उत्तमोत्तम गझला आठवतात. ‘गुलों में रंग भरे बादे नौबहार चले । चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले ।’, किंवा ‘अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें […]

न किसी की आँख का नूर हूँ (१८५७शी निगडित सुप्रसिद्ध गझलबद्दल)

प्रास्ताविक : २००७ मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला १५० वर्षें पूर्ण झाली. कांहीं लोकांनी त्याची दखल घेतली न घेतली. २०१२ मध्ये, त्या स्वातंत्र्यसमराचा घोषित नेता, अखेरचा मुघल बादशहा बहादुरशाह ज़फ़र याच्या मृत्यूला १५० वर्षें झाली. त्याकडे फारसें कुणाचेंच लक्ष गेलेलें नाहीं. २००७च्या शंभर वर्षें आधी, जेव्हां १८५७ च्या ‘गदर’ला ५० वर्षें पूर्ण झाली होती, तेव्हां स्वातंत्र्यवीर सावरकरांनी […]

गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण होतें आहे काय ? (एक चिंतन)

प्रास्ताविक : मागे एकदा माझ्या वाचनात आलें की, कांहीं वर्षांपूर्वी, मराठी साहित्यिक संमेलनात,  ‘गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण’ असा एका परिसंवादाचा विषय होता. त्या परिसंवादात योग्य तो निष्कर्ष काढला गेला, असेंही वाचले. तें कांहींही असो, पण ‘गझलचें आक्रमण’ असा विषय संमेलनात चर्चेला यावा हीच मुळात काळजीची गोष्ट आहे. कोणी जर , ‘आक्रमण झालें आहे’ असें म्हणत असेल […]

1 2 3 4 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..