नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत. […]

देवीच्या ५१ शक्तिपीठांची निर्मिती

भगवान शंकराच्या आहुतीने मंत्र वगळून पुढील आहुती सुरु झाल्या आपल्या पतीचा झालेला हा अपमान मात्र सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर

झाला आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले.
[…]

श्री. वरदविनायक – महड

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
[…]

मराठी कलाकारांचा वाङमयीन स्पर्श

आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं.
[…]

कर उत्पन्न आणि देशाचा सर्वार्थाने विकास !

बऱ्याचदा विकसनशील देशाचा अर्थसंकल्प आखतांना काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्यात येतो. कुठल्या प्रकल्पांना प्राधान्य द्यायचे, संरक्षणावर किती खर्च करायचा आणि बरेच काही. भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून आणि परकीय उद्योजकांना भारतीय क्षेत्र खुले झाल्यापासून परकीय उद्योजकांच्या बजेटकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.
[…]

नाट्य-चित्र कानोसा – धतिंग धिंगाणा

मराठीत सध्या वेगळ्या आशयाचा, वेगळे विषय असलेले सिनेमे रिलीज होत आहेत, ही जरी सुखावणारी बाब असली तरी सुद्धा जेव्हा ‘कॉमेडी’ ढंगातील मराठी चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र काहीसं निराशाजनक चित्र आज डोळ्यापुढे उभं राहतं…
[…]

मारेकर्‍यांसाठी पायघड्या !

आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
[…]

फ्रान्सचे अध्यक्ष ओलांदे यांची भारतभेट

मालदीव, श्रीलंकेतील अलीकडच्या घडामोडींच्या निमित्ताने शेजारी राष्ट्रांबाबतच्या भारताच्या अनाकलनीय धोरणाचा पुन्हा प्रत्यय आला. पाकिस्तान, चीनबरोबरची डोकेदुखी कायम असताना बांगला देश, नेपाळ आदी शेजार्‍यांशीदेखील आपण सुरळीत संबंध राखू शकत नाही याला कारणीभूत ठरतात आपली चुकीची गृहितके. फ्रान्सच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर फ्रान्स्वा ओलॉद यांनी युरोपबाहेरील पहिल्या परदेश दौर्‍यासाठी भारताची निवड करावी, यावरून भारताबरोबरच्या संबंधांना तो देश किती महत्त्व देत आहे, ते कळते.
[…]

मराठी- इंग्रजाळलेली की मराठमोळी ?

माझिया मराठीची परि बोलू किती कौतुके।

परि अमृतातेतही पैजा जिंके ।।

असे रसपूर्ण वर्णन असणार्‍या मराठी भाषेने आपला हक्काचा दिवस २७ फेब्रुवारीला साजरा केला. या निमित्ताने का होईना पण अनेक इंग्रजी भाषिक महाराष्ट्रीय लोकांनी मराठीचे गोडवे गायले….अनेक वृत्तपत्रांनी तर संपूर्ण पुरवण्याच या भाषेसाठी देऊ केलेल्या. खुद्द मराठी भाषेलाच स्वत: ‘सेलिब्रिटी’ झाल्यासारखं वाटलं असेल.

फक्त मराठी भाषा दिनालाच मराठीचे पुरवणीभर गोडवे गाण्यापेक्षा रोज अभिमानाने शुद्ध मराठमोळ्या मराठीत संवाद साधूया आणि अभिमानाने सांगूया, हो ! आम्ही मराठी आहोत. आम्ही ‘महाराष्ट्रियन्’ नाही, आम्ही ‘महाराष्ट्रीय’ आहोत.
[…]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..