नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – धतिंग धिंगाणा

मराठीत सध्या वेगळ्या आशयाचा, वेगळे विषय असलेले सिनेमे रिलीज होत आहेत, ही जरी सुखावणारी बाब असली तरी सुद्धा जेव्हा ‘कॉमेडी’ ढंगातील मराठी चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र काहीसं निराशाजनक चित्र आज डोळ्यापुढे उभं राहतं. विनोदी चित्रपटांची खरंतर खूपच समृध्द परंपरा आपल्याला लाभली आहे. पण सध्याचे मराठी विनोदी चित्रपट पाहिले की लक्षात येतं, जणू आता ‘विनोदाचा संच’ संपत चाललाय आणि प्रेक्षकांना हसवण्यासाठी ज्या तोडीचे विनोद निर्माण करायला हवेत किंवा विनोदी चित्रपटात असायला हवेत त्यासाठी प्रयत्नच केले जात नाहीत.

१ मार्चला रिलीज झालेल्या ‘धतिंग धिंगाणा’ साठी हमखास असं सांगावसं वाटतं की असे सिनेमे बघून प्रेक्षकांची विनोदी रसिकताही कमी होत राहिल, ज्यामुळे मराठी प्रेक्षक हा विनोदी चित्रपटापासून कायमचा दुरावेल, असं निर्मात्यांना सांगणं आहे.

आदिती सारंगधर, अंकुश चौधरी, निलम शिर्के, अतुल परचुरे, प्रसाद ओक, श्वेता भोसले, वंदना गुप्ते, कै. आनंद अभ्यंकर, दिगंबर नाईक, स्मिता तळवलकर सारखी ‘स्टार मंडळी’ असताना दिग्दर्शक मंदार देवस्थळी खूपच कमी पडल्याचं दिसून आलंय.

या कथेत वंदना गुप्तेंचा मुलगा म्हणजे अंकुश चौधरी याचा विवाह वंदना गुप्तेंच्या बालमित्राच्या मुलीशी म्हणजेच आनंद अभ्यंकर यांची मुलगी ‘गौरी’ अर्थात आदिती सारंगधरशी करायचा असा अट्टाहास सुरु होतो आणि तिथून पुढे ही कथा सरकत जाते. यामध्ये आदिती सारंगधरच्या गौरी भूमिकेने प्रेक्षकांना पार निराश करून ‘बोर’ही केलंय. अगदी फिल्मी स्टाईलच्या भूमिकेमुळे आदितीच्या अभिनयात काहीसं खास नसल्याचं या चित्रपटातून जाणवतं. तर मध्येच एका ‘पाकिटमाराची’ भूमिका साकारत असलेल्या निलम शिर्केची एंट्री होते. तिथून तिची भेट, पोलिसांच्या भुमिकेत वावरणार्‍या अतुल परचुरे आणि श्वेता भोसलेशी होते, जे तिला पकडण्यासाठी उत्सुक असतात. कारण एका दरोडेखोर टोळीला पकडण्यासाठी त्यांना निशा म्हणजेच निलम शिर्केच मदत करु शकेल, असा ठाम विश्वास असतो. त्यातून मध्येच बुटक्यांची दरोडेखोराची टोळीही दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे काहीशी रंजकता येते पण ती तेवढ्या वेळापुतीच. त्यासोबतच प्रसाद ओकनी साकारलेल्या व्यक्तिरेखेनंही रसिकांची पार निराशा केली आहे असं म्हणावं लागेल. कारण त्या भूमिकेत डोक्यावर जर का मार बसला तर त्यातून दरवेळी वेगवेगळ्या धाटणीतील त्याचा वावर काहीसा मनाला न पटणाराच वाटतो.

कथेचा आशय पुढे सरकतो तो म्हणजे प्रचंड गोंधळातून, गैर समजुतीतून आणि अनावश्यक असलेल्या सीन्स मधून.

चित्रपटातील संवादातून, कथा आणि पटकथेतून विनोदाची निर्मिती करण्याचा पोरकट प्रयत्न केला गेलाय. काहींच्या विनोदी अभिनयाचा अतिरेक झाल्यामुळे अजिबात हसायलाही येत नाही. क्वचित एखाद-दोन प्रसंग सोडले तर.

अभिनेते अतुल परचुरेंनी सहज अभिनय वावरामुळे पोलीसी भूमिकेला काहीसा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय पण सर्वात जास्त निराशा झाली आहे ती अंकुश चौधरी, आदिती सारंगधर आणि प्रसाद ओक कडून. निलम शिर्केनीही बर्‍यापैकी धाडस केलंय एका चोराची भुमिका साकारताना.

त्याशिवाय अजय-अतुल यांचं चित्रपटातलं संगीत आणि गुरु ठाकूर, श्रीरंग गोडबोलेंची गीतं, चित्रपटाला इंटरव्हल नंतर काहीशी रिफ्रेश करतात. संजय जाधव यांचं छायाचित्रणही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणावी लागेल. तसंच संकलन, तांत्रिक सफाईदारपणा चित्रपटाला काहीसं सांभाळून घेतात. पण यामुळे चित्रपट रसिकमनांना नक्कीच भावत नाही. कारण जो मुळ आशय आहे तोच स्पष्ट झालेला नाही. अनेक प्रसंग असे निर्माण होतात की जेव्हा दोन विरुध्द मनं ज्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही ती नकळतच एखाद्या घडलेल्या प्रसंगामुळे जवळ येतात आणि शेवटी त्यांचं मिलन होतं. त्यात भर म्हणजे दरोडेखोरांच्या टोळीची, ती टोळी कशी आणि कुठे पकडली जाते हे पाहताना ऐंशीच्या दशकातील एखादी विनोदी मराठी चित्रपटाची आठवण झाल्यावाचून राहवत नाही. आणि तशातच शत्रुंचा म्हणजे खलनायकांचाही ‘हॅप्पी स्टाईल एंडिंग’ होतो.

थोडक्यात कथेत भरकटून मुळ आशय आणि विषयांपासून वाहत गेलेला धिंगाणा असंच या चित्रपटाचं वर्णन करता येईल.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..