नवीन लेखन...

पाकिस्तानचे अफ-ताल-काश्मिर धोरण

सशस्त्र कट्टर जिहादींच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या घुसखोरीमुळे तसेच पश्तुनी भाषेत बोलणार्या कट्टर तालिबानी जिहादींकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मिरमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता वाढली आहे. या दोन्ही कारणांमुळे भारतीय नियंत्रण रेषेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे सुरक्षादलांनी व १ पॅरा स्पेशल फोरर्सेस यांनी आक्रमक हालचाली करून घुसखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
[…]

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही? […]

भारतरत्न धोंडो केशव कर्वे

कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला […]

जळगावचं वांग्याचं भरीत

नोंव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यात वांग्याच्या भरीताला चव असते. जून-जुलैत लागवड केलेली वांगी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विक्रीसाठी बाजारात येतात. माणसी १ किलो या प्रमाणे घरातील एकूण कुटुंबाला लागतील तितकी वांगी खरेदी केली जातात. त्यासोबत हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, लसूण, शेंगदाणे हे पदार्थ भरतासाठी लागतात. काड्यांवर किंवा काट्यांवर भाजलेले वांग्याचे भरीत अधिक चविष्ट असते. म्हणून खास भरीतासाठी तुर खाटी किंवा कपाशीच्या कांड्याचे ढीग करुन ठेवले जातात. […]

वनौषधीपासूनचे बिस्कीट्स-आईस्क्रीम

निसर्गाने मानवाला दिलेली नैसर्गिक संपत्ती ही अनमोलच आहे. त्यात कोकणाचा विचार केला तर कोकणाला लाभलेले हे निसर्गाचे वरदान पर्यटनासोबत आरोग्य संवर्धक देखील आहे. कोकणच्या जंगलात सापडणार्‍या शेकडो वनौषधी मनुष्याच्या आरोग्याला हितकारक आहेत. त्यांच्या योग्य वापराने आपण निरोगी राहू शकतो.
[…]

चित्रपती व्ही. शांताराम

व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.
[…]

अ बॅकग्राऊंडर ऑन महाराष्ट्र – लोकसभा २००९

राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात. नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा ‘बॅकग्राऊंडर’चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते. […]

निवडणूक मार्गदर्शक तत्त्वे – काय करावे, काय करु नये

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..