नवीन लेखन...

अ बॅकग्राऊंडर ऑन महाराष्ट्र – लोकसभा २००९

A backgrounder on Maharashtra

राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात.  अवघ्या १५ दिवसांच्या अथक परिश्रमात सार्वत्रिक कौतुक झालेली एक संदर्भ पुस्तिका ‘अ बॅकग्राऊंडर ऑन महाराष्ट्र’ नुकतीच प्रकाशित करण्यात आली. नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव डॉ. अमिताभ राजन यांच्या हस्ते तथा अप्पर निवासी आयुक्त अनुप वाधवा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

या नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा ‘बॅकग्राऊंडर’चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते. ही या पुस्तिकेमागची भूमिका होती. संदर्भग्रंथ म्हणून नेहमीसाठी संग्रही ठेवावी अशा पध्दतीने या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आल्याने राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रतिनिधींनीही त्याचे मुक्तकंठाने कौतूक केले.

लोकसभेची निवडणूक असल्याने पुस्तिकेच्या कव्हरपेजवर संसदेचे चित्र छापण्यात आले आहे. त्याच्याच आतील बाजूस १५ व्या लोकसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यात निवडणूक तारखा, निवडणूक होवू घातलेल्या मतदारसंघाची नावे, अर्ज दाखल करण्याचा व मागे घेण्याच्या तारखा, छाननीचा दिनांक, मतमोजणीची तारीख, अशी सगळी माहिती अगदी सुटसुटीत आहे. त्याच्याच खाली केंद्रीय व राज्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची नावे, फोन नंबर देण्यात आले आहेत. उमेदवाराला किंवा मतदारांना संबंधित अधिकार्‍यांशी सहज संपर्क साधता यावा, हा यामागचा उद्देश आहे.

बॅकग्राऊंडरच्या पहिल्या प्रकरणात महाराष्ट्रातील बदललेले लोकसभा मतदारसंघ, मतदारसंघाअंतर्गत येणारे क्षेत्र (गावनिहाय) आदिंची माहिती आहे. सोबतच सर्वसाधारण गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसर्‍या प्रकरणात २००४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत विजयी तथा दुसर्‍या क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवारांची नावे पक्षनिहाय मतदारसंघांसह देण्यात आली आहेत. यासोबतच २००४ नंतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार तथा दुसर्‍या क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवारांची यादी आहे. राज्याच्यादृष्टीने निवडणुकीचे विश्लेषण करतांना पोटनिवडणुकींचाही विचार व्हावा, हा यामागचा उद्देश आहे.

त्यापुढील प्रकरणात १९७७ पासून तर २००४ पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांचे सविस्तर विश्लेषण देण्यात आले आहे. १९७७ पासूनचे विजयी उमेदवार, दुसर्‍या क्रमांकाची मते घेणारे उमेदवार, विजयी व पराभूत उमेदवारांसह रिंगणात असलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली मतांची टक्केवारी तक्तेनिहाय सविस्तर मांडण्यात आली आहे. मागील तीन पानांवर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून म्हणजे १९६२, १९६७ व १९७१ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची पक्षनिहाय नावे दिली आहेत. सर्वात शेवटच्या पानावर महाराष्ट्रामध्ये यावर्षी होणार्‍या निवडणुकीमध्ये मतदानसंघनिहाय मतदानाचा अधिकार बजावणार्‍या स्त्री-पुरुषांची संख्या देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने पुनर्रचित मतदारसंघाची यादी घोषित केली असली तरी मतदारसंघाच्या नकाशांचे लोकांना आकर्षण असते. त्यामुळे मतदारसंघाचा विस्तार लक्षात येतो. त्यामुळे मागील पानावर मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्राचा सुटसुटीत नकाशा जोडण्यात आला आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने काढण्यात आलेले हे बॅकग्राऊडंर अतिशय उपयुक्त असेच आहे.

 

Source: ‘महान्यूज’

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..