नवीन लेखन...

पुण्यातल्या फरासखाना पोलिस ठाण्यासमोर झालेला स्फोट

 

सरकारी काम आणि थोडा वेळ थांब. कुठलेही कंत्राट निघाले की प्रत्येक जण मला किती मिळणार याचाच विचार करतो. पण सामान्य लोकांसाठी मात्र कोणीही काहीही करत नाही. भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा हा या सरकारी नोकरांच्या रक्तात इतका खोलवर मुरला आहे की त्यांना सामान्यांच्या जीवनाचे मोल जाणवत नाही. राज्यकर्ते ते अगदी शिपायाच्या पातळी पर्यंत सगळेच भ्रष्ट असल्यामुळे हे घडत आहे. कॅमेरे लावण्याचे काम कधी होईल ते कुणीही ठामपणे सांगू शकत नाही.
जोपर्यंत जाज्वल्य देशाभिमान येणार नाही तोपर्यंत असले प्रकार होत राहतील. कसलीही दया माया न दाखवता हे प्रकार चिरडून काढा. पुण्यातल्या फरासखाना पोलिस ठाण्यासमोर झालेला स्फोट हा खूपच कमी क्षमतेच्या बॉंबचा असला, तरी त्यामुळे राज्य सरकारपासून ते स्थानिक पोलिस दलापर्यंतच्या सर्व यंत्रणांचा गहाळपणा मात्र तीव्रपणे समोर आला. मुंबईप्रमाणेच पुणे महानगरही दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून स्पष्ट झाले आहे. त्याचे पहिले प्रत्यंतर आले ते १३ फेब्रुवारी २०१० ला कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत झालेल्या भीषण स्फोटाने. त्या स्फोटात सतरा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे एक ऑगस्ट २०१२ ला जंगली महाराज रस्त्यावर साखळी पद्धतीने चार बॉंबस्फोट घडवून आणण्यात आले. हे दोन्ही स्फोट इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने केले होते. त्यातील दहशतवाद्यांचा तपास लावण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी झाली असली, तरी या पुढील काळात असे स्फोट होऊ नयेत, यासाठी योग्य यंत्रणा उभारण्यात मात्र अपयश आले आहे. एक ऑगस्ट २०१२ ला झालेल्या दुसर्याय स्फोटानंतर तर पुण्यात या पुढेही असे प्रकार करण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना करणार, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले होते. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येतील, अशी घोषणा केली. त्या घोषणेला आता जवळजवळ दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षांत या योजनेच्या नावाने धावले ते केवळ कागदी घोडे. निविदा प्रक्रियेतला घोळ, त्यानंतर महापालिकेकडून खोदकामाला परवानगी मिळविण्याचा घोळ, कंत्राटदाराने काम सुरू करण्यास खळखळ केल्याचा घोळ… एकूण घोळच घोळ. सामान्य पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्नर असलेल्या या उपाययोजनांबाबत पोलिस यंत्रणा आणि पर्यायाने सरकारही उदासीन आहे, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
फरासखान्याजवळ सीसीटीव्ही यंत्रणा योग्य वेळी बसली असती, तर बॉंब असलेली मोटारसायकल ठेवून निघून जाणार्या गुन्हेगाराची प्रतिमा पोलिसांना विनासायास मिळाली असती आणि त्यामुळे तपास सुकर झाला असता. सीसीटीव्हीची जी गत, तीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसराच्या सुरक्षेची. महाराष्ट्राच्या कानाकोपर्याततून विविध कामांसाठी नागरिक पुण्यात येत असतात आणि त्यापैकी अनेक जण जाताना दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतात. वास्तविक पुण्याच्या ऐन गर्दीच्या रस्त्यालगत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. हा गर्दीचा रस्ता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आणखी गजबजून जातो. आता दहशतवाद्यांच्या धमक्यां नंतर मंदिरासमोर भिंतच उभारण्यात आली. या भिंतीमुळे देवळाची सुरक्षितता साध्य झाली; पण देवळाच्या आसपासच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कुणी गांभीर्याने अन्य उपाययोजना केली नाही. देवळाच्या आसपास झालेली अतिक्रमणे हटविण्याची भाषाही अशीच काही घडले की जोर धरते. या विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण एक वेळ काढता येईल; पण देवळाच्या लगत असलेल्या मजूर अड्ड्याच्या जागेवर पोलिसच जप्त केलेल्या गाड्या उभ्या करतात, त्याचे काय? ही जागा मजुरांच्या संस्थेला दिलेली असून पोलिसांचे हे अतिक्रमण असल्याची या मजुरांची तक्रार आहे. अनेक दिवस एकाच जागी पडून राहणार्याच या गाड्यांचा वापर कुणीही बॉंब ठेवण्यासाठी करण्याची शक्यता आहे.
आता पुन्हा स्फोट झाल्यानंतर सुस्त यंत्रणांना पुन्हा जाग येईल. दोन दिवस धावपळ होईल. राज्याचे गृहमंत्री असलेले आर. आर. आबा आणि पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली अन्‌ आता “गणेशोत्सवाच्या आत पुण्यातल्या किमान दोन पोलिस विभागांत सीसीटीव्ही उभारण्याचे काम करू,‘ असे नवे आश्वा सन दिले. यथावकाश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही फेरी होईल. प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्यांाच्या फ्लॅशचा चकचकाट होईल, त्यांच्याकडूनही आश्वाचसनांचे फवारे उडतील, वृत्तपत्रांचे कॉलम भरले जातील, चॅनेलवाल्यांच्या बातम्यांमधील काही मिनिटांची जागा “बाईट‘ने भरून निघेल. दोन-चार दिवस माहेरी गेलेली तीच सुस्ती पुन्हा परतेल आणि पुणेकर जीव टांगणीला लावून भर गर्दीत आपापले व्यवहार करीत राहतील. यापूर्वी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉंबची पिशवी ठेवून पलायन करण्याचा प्रयत्न कतिल सिद्दिकी या दहशतवाद्याने केला होता. एका विक्रेत्याच्या सजगतेमुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा आणखी एका स्फोटाला पुणेकरांना सामोरे जावे लागले असते. या सार्या घटना घडूनही आपण धडा शिकत नाही आणि त्यामुळे पोलिसाचीच मोटारसायकल चोरून आणि पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही फूट अंतरावर ती बॉंबसह ठेवून उडवून देण्याची दहशतवाद्यांची हिंमत होऊ शकते. आता तरी आपण गाढ निद्रेतून किंवा निद्रेच्या सोंगातून बाहेर येणार का, एवढाच प्रश्न आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..