नवीन लेखन...

मोबाईल अन् बलात्कार

मोबाईल फोनच्या वापरामुळे बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांत वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढून कर्नाटक विधानसभेच्या एका समितीने मोबाईल फोनवर बंदी घालण्याची शिफारस सरकारकडे केली आणि देशभरात एकच खळबळ माजली. कर्नाटक सरकारवर टीकाही करण्यात येत आहे. पण ज्या कारणांनी हा निष्कर्ष काढला गेला, ते पाहता कर्नाटक विधानसभेच्या समितीच्या शिफारशीला पूर्णतः चुकीचे ठरवता येणार नाही.

वास्तवात मोबाईल आणि संगणक या दोन गोष्टी महिला आणि मुलींवर बलात्कार होण्याचे सद्यपरिस्थितीतील प्रमुख कारण मानले जायला हवे. सोशल मीडिया साईट्स आणि मोबाईलचा वापर मुली ज्या मुक्तपणे करतात आणि त्यामुळे ज्या पद्धतीने अडचणीत सापडतात याकडेही लक्ष जायला हवे. मुलीकडे मोबाईल आला म्हणजे तिचा नंबरही अन्य मैत्रिणींकडे जातोच. काही मित्रांकडे गेला, की एकाकडून दुसर्‍याकडे आणि दुसर्‍याकडून तिसरीकडे अशी नंबरची वाटचाल होत असते. त्यातून चुकीच्या व्यक्तीच्या हाती नंबर गेला की, मुलीच्या अडचणी वाढायला लागतात. अनेकदा अनोळखी नंबरवरून येणारा कॉल मुली उचलतात आणि हा नंबर मुलीकडे असतो हे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते. त्यातून मग काही वाईट प्रवृत्तीची मंडळी गैरफायदा घ्यायला सुरुवात करते.

सोशल मीडियावर यासारखीच स्थिती आहे. तिथे तर थेट संपर्क साधता येण्याची सोय असते. बेफिकिरपणा आणि मित्र वाढविण्याची लालसा यातून संकट ओढवून घेतले जाते. सभोवतालचे जग समजतो इतके साधे नक्कीच नाही आणि कोण कधी काय संकट आणेल सांगता येत नाही, याची जाणीव मुलींना व्हायला हवी. याचा अर्थ त्यांनी बंधनात राहावे असा मुळीच नाही. पण स्वतःची सुरक्षा जपण्यासाठी जागरूकता आणि काळजी घेणे गरजेचे आहे.

जग एकविसाव्या शतकाकडे जात आहे. आज मुली कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. मुलांच्या बरोबरीने मुलीही काम करत आहेत हे बोलायला जितके सोपे वाटते, प्रत्यक्षात तशी परिस्थिती अजिबात नाही, हे मुलींनी जाणायला हवे. त्यामुळे बिनधास्तपणा एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. मोबाईल वापरताना मुलींनी आपले परिचित सर्वांचे नंबर सेव्ह करायला हवेत. अनोळखी नंबर कोणत्याही परिस्थितीत न उचलणे हेच हितकारक ठरते. पालकांनीही मुलींना ही बाब पटवून दिली तर त्यांची अर्धी चिंता दूर होईल.

सोशल मीडियाचाही वापर करताना मुलींनी अनोळखी व्यक्तींच्या मित्रविनंत्या स्वीकारू नयेत. मित्रसंख्या वाढविण्याच्या नांदात आपण आपल्याच गळ्याला फास लावून घेत आहोत, हे लक्षात घ्यावे. सोशल मीडियाचा वापर पुरुष मित्रांशी संवाद एका ठराविक मर्यादेपर्यंत असू द्यावा. अर्थात उगीच जवळीक साधणाèया व्यक्तीला तिथेच थांबवणे कधीही हितप्रद. आजची मुलगी बंधनात राहू इच्छित नाही. तिने राहूही नये. पण जोपर्यंत प्रत्येक मुलीला सुरक्षित अशी परिस्थिती निर्माण होत नाही. तोपर्यंत तरी मुलींनी काही बंधने स्वतःला घातलीच पाहिजेत, असे आमचे मत आहे.

– मनोज सांगळे, जळगाव

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..