जागतिक शांतता

World Peace

जागतिक शांतता ही एखाद्या देशात घडणारे खून,चोर्‍या, दरोडे आणि बलात्कार याच्याशी निगडीत नाही. जेंव्हा जगातील कोणत्याही भागात आतंकवादी कारवाया होतात तेंव्हा जागतिक शांतता भंग पावते. पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दाच्या वेळी जागतिक शांतता मोठ्या प्रमाणात भंग झाली होती. त्यापूर्वी म्ह्णजे हजारो वर्षापूर्वीपासून जागतिक शांतता कधीही प्रस्थापित झालेली नव्ह्ती. दिडशे वर्षापूर्वीपर्यत जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. अलिकडच्या काळात जेंव्हा यांत्रिकी प्रगती अत्यंत वेगाने झाली तेंव्हा जग एका क्लिकच्या अंतरावर इतके जवळ आले तेंव्हापासून जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वात आली. शेकडो वर्षापूर्वी भगवान गौतमबुध्दांनाही हिच जागतिक शांतता अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, त्यांच्या प्रयत्नाना बर्‍यापैकी यशही आले होते. पण नंतरच्या काळात त्यांचे ते स्वप्न धुळीला मिळाले. आजही जर जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर जगाला भगवान बुध्दांच्याच विचारांची कास धरावी लागेल त्याला पर्याय नाही. पण आता जागतिक शांतता भंग करण्याला प्रामुख्याने करणीभूत ठरत आहे तो म्ह्णजे धर्मवाद ! जोपर्यत मनुष्य धर्माच्या बंधनातून बाहेर येत नाही तोपर्यत जागतिक शांतता निर्माण होण केवळ अशक्य आहे. जगभरात अशांतता निर्माण करून आतंकवाद मजविण्यास आजच्या घडीला इस्लामिक आतंकवाद आघाडीवर आहे त्यात आता भर म्ह्णून की काय हिंदू आतंकवादही डोकं वर काढताना दिसत आहे. इसाई आतंकवाद प्रत्यक्षात नसला तरी तो संपत्ती, बळ आणि सत्तेच्या जोरावर आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न करताना संपूर्ण जगभरात दिसतोच आहे तो ही जागतिक शांतता निर्माण करण्याच्या मार्गातील प्रमुख अडसर आहे.

जगभरातील जवळ – जवळ 195 देशातील जवळ्पास 121 देशात थोड्याफार फरकाने आतंकवादाने डोक वर काढलेले आहेच. हे पहाता जागतिक शांतता प्रस्थापित होणे हे जवळ – जवळ अशक्य आहे. आतंकवादात भारताचा सहावा क्रमांक आहे तर जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या चीनचा 25 वा क्रमांक आहे. याचा अर्थ आजच्या घडीला चीन आतंकवादाशी लढण्यात भारतापेक्षा अधिक यशस्वी झाला आहे. आतंकवाद हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे कारण जर खर्‍या अर्थाने जागतिक शांतता प्रस्थापित करायची असेल तर भारतालाच महत्वाची भूमिका बजावावी लागेल. सध्या आशिया खंड हाच खर्‍या अर्थाने आतंकवादाचा अड्डा झालेला आहे . आणि त्याच्या केंद्रस्थानी काश्मिर आहे. जोपर्यत काश्मिर मधे शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यत जागतिक शांतता ही एक कवी कल्पनाचं म्ह्णावं लागेल. जागतिक शांतता तशी कधी खर्‍या अर्थाने प्रस्थापित झालेली नव्हतीच. आणि ती होण्याची शक्यता तशी धुसरच आहे. संपूर्ण जगात जेंव्हा शांतता असेल तेंव्हा कदाचित मानव प्राणी या जगातून नाहीसा झालेला असेल. आता जगातील जवळ पास दोन डजन देशांनी अणूबॉम्बची निर्मिती केलेली आहे. दररोज जगातील कोणत्याना कोणत्या देशात आतंकी हामले होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनताही आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. भारत पाकिस्तानच्या सीमा भागात राहणारे लोक तर साक्षात मृत्यूच्या सावटाखालीच जीवन जगत असतात. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात भारत महत्वाची भुमिका बजावण्यात सक्षम असतानाही भारताला आपली शक्ती आतंकवादा विरोधात लढण्यात वाया घालवावी लागत आहे.

आज जगभरातील जवळ जवळ सर्वच राष्ट्रे अणूबॉम्ब्‍ बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेतच त्यासोबत आपली सैनिकी ताकद वाढविण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. भारतही अधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे. वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी पेटेल या भितीने आप – आपली सैनिकी ताकद वाढविण्यास प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात याबाबतीत आता स्पर्धा सुरू झालेली आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. पूर्वी म्ह्टलं जायचं तिसरं महायुध्द तेलासाठी लढलं जाईल, आता म्हटलं जातय पाण्यासाठी होईल, कालांतराने म्ह्टल जाईल मुलभूत गरजांसाठी लढलं जाईल. जोपर्यत जगात तिसरे महायुध्द होण्याची शक्यता दृष्टीक्षेपात आहे तोपर्यत जगात शांतता नांदणे शक्य नाही. भारतातील काश्मिरवर संपूर्ण जगाचा डोळा आहे पण भारत पाकिस्तानसाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न झालेला आहे. भारत पाकिस्तान मधे झालेल्या युध्दांना काश्मिर हे एकमेव कारण आहे. अमेरीकेने आपल्या ताकदीच्या जोरावर इराकवर ताबा मिळविला खरा पण तेथे शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी झालेली नाही. आजही तिथून सातत्याने आतंकी हमल्याच्या बातम्या येतच असतात.

जर जागतिक शांतता निर्माण करायची तर जगभरातील 121 देशातील आंतकवादाचा नायनाट करावा लागेल पण ते करणे सर्व देशांना मिळूनही शक्य होईल की नाही याबद्दल शंकाच आहे कारण काही देशच आतंकवादाचे अड्डे स्वतःहून झालेले आहेत. भारत आणि चीन मधील वाढती लोकसंख्या मुलभूत गरजा पूर्ण होण्याचा अभाव, काही अंशी आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरतोय त्यासोबत प्रत्येक देशातील धार्मिक राजकारणही त्याला कारणीभूत आहे. प्रत्येक देशातील अल्पसंख्यांक स्वतःला त्या देशात असुरक्षित समजतात कधी कारण असताना तर कधी विनाकारणही ! त्यांची ही असुरक्षिततेची भावनाही जागतिक आंतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठरतेय ! कोणत्याही देशातील अंतर्गत आतंकवादही आता डोकं वर काढू लागलेला आहे. ज्याचा बंदोबस्त करणं तर अधिक अवघड असतं. अंतर्गत आतंकवादा समोर तर बलाढय देशांनाही मान तुकवावी लागते. या जागतिक आतंकवादामुळेच संपूर्ण जग पहाण्याच्या आपल्या स्वप्नाला कित्येकांना मुरड घालावी लागते.

जागतिक शांतता जर खरोखरच प्रस्थापित झाली तर मनुष्याच्या जगण्याला एक योग्य दिशा मिळेल. त्याचं जीवन अधिक सुसज्ज आणि आनंदी होण्याला मदत मिळाली असती. जागतिक शांतता ही फक्त अहिंसेच्या मार्गानेच अस्तित्वात येऊ शकते असं वर वर वाटत असल तरी बर्‍याचदा शस्त्रास्त्राच्या धाकाने शांतता प्रस्थापित झाल्याचे पहाण्यात येते. मनुष्याच्या मुलभूत गरजा पूर्ण न होणे आणि भौतिक साधनांचा हव्यास मनुष्यास स्वस्थ बसू देत नाही. त्यातुनही आतंकवाद जन्माला येतो. तो आतंकवाद काहींच्या स्वार्थाने फोफावतो आणि जगातील शांतता नष्ट करून अशांतता निर्माण करतो. जगात अशांतता निर्माण करण्यासाठी तरूणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. शक्तीशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर काही काळ जगात शांतता निर्माण करू शकतात. जागतिक शांततेवर गेली कित्येक वर्षे चर्चा होत आहे. त्यातून एकीकडे अहिंसेचा मार्ग समोर येत असताना दुसरीकडे हिंसेचा मार्ग अवलंबिला जात आहे. जागतिक शांतता प्रत्यक्षात येण तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा जगातील प्रत्येक माणसांच्या हृद्यात अहिंसेचा उगम झालेला असेल.

जागतिक शांतता ही फक्त देशा-देशात युध्दे न होऊ देणे इतकी सिमित करावी लागेल आणि तस होतय म्ह्णजे जागतिक शांतता आहे असं म्ह्णायला हरकत नाही असं म्ह्णून समाधान मानावे लागेल. भौतिक साधनांच्या अधिक वापरामुळे, वाढत्या मानसिक त्रासामुळे आणि वाढत्या स्पर्धेमुळे माणूस अधिक उग्र होत चाललेला आहे. त्याची सहनशक्ती कमी होत चालली आहे. वाढते जागतिक तापमान पर्यावरणाचा र्‍हास अनैसर्गिक गोष्टींची निर्मिती ही आतंकवादास पोषख ठरत आहे. कोठेतरी वाचनात आलेली एक गोष्ट आहे सिकंदर जेंव्हा जग जिंकत भारतात आला तेंव्हा आपल्या सैन्यासह तो प्रचंड आवाज करत जात असताना एका झाडाखाली शांत बसलेला एक साधू क्षणभरही विचलीत झाला नाही. ते पाहून सिकंदर त्याच्या जवळ गेला आणि त्याला हलवून जागं केल आणि म्ह्णाला,’ माझ्या सैन्याच्या इतक्या प्रचंड आवाजानेही तू क्षणभरही व्यतीत झाला नाहीस, हे कसं शक्य आहे ? त्यावर त्या साधूने त्याला उलट प्रश्न केला ? तू कोण आहेस, कोठून आलास आणि आता कोठे चालला आहेस ? त्यावर तो म्ह्णाला,’मी सिकंदर, जग जिंकण्यासाठी निघालोय जग जिंकत जिंकत आता हा देश जिंकायला आलोय ! त्यावर तो साधू म्ह्णाला,’ मग संपूर्ण जग जिंकल्यावर काय करणार आहेस ? त्यावर तो म्ह्णाला,’ काही नाही ! एका झाडाखाली शांत बसेन. त्यावर तो साधू शांतपणे ह्सत त्याला म्ह्णाला,’ सध्या मी तेच करतोय !

सांगायच तात्पर्य इतकच प्रत्येक मनुष्याला त्याच्या मर्यादा कळत नाहीत, जीवनाचं रह्स्य उमजत नाही आणि जीवनाच्या अंतीम ध्येयापर्यत पोहचण्याची इच्छा त्याच्या अंर्तआत्म्यात निर्माण होत नाही तोपर्यत जागतिक शांतता ही स्वप्नासारखी होती, स्वप्नासारखी आहे आणि स्वप्नासारखीच रहाणार आहे.

निलेश दत्ताराम बामणे
(कवी,लेखक आणि संपादक- मासिक ‘साहित्य उपेक्षितांचे’)
पत्ता- वेदान्त कॉम्प्युटर
श्रम साफल्य सो., स्मिता इंटरप्रायझेसच्या शेजारी,
संतोष नगर बसस्टॉप जवळ, संतोष नगर,
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई-400 065
मो. 9029338268, 8652065375
Email – nileshbamne10@gmail.comमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
p-475-ThermalPowerstationBhusawal

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात ...
p-558-ichalkaranji-rajwada

महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इचलकरंजी

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले ...
paithani-sarees-2-300

पैठण – दक्षिण काशी

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या ...

Loading…

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*