नवीन लेखन...

मुंबई – एक अस्वच्छ शहर आहे का ?

जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले. मुंबई जर अस्वच्छ शहर असेल तर आंम्ही मुंबईकरही त्या अस्वच्छतेला कोठेतरी कारणीभूत असणारच की ! या सर्वाचा बविचार करता काही महिन्यांपूर्वी माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग मला आठविला मी बसमधून प्रवास करीत असताना मला माझी वर्गमैत्रिण नीलम मला बसमध्ये भेटली माझ्या बाजूची सीट रिकामी असल्यामुळे ती माझ्या शेजारीच बसली सर्वसामान्य तरूणींसारखा तिने माझ्याकडे खिडकीजवळ बसण्याचा आग्रह नाही धरला. बर्‍याच दिवसानंतर भेटल्यामुळे आमच्या गप्पा बर्‍यापैकी रंगल्या होत्या ज्या आजुबाजुला उभा असणार्‍या तरूणी कान देऊन ऐकत होत्या. आंम्ही दोघेही बर्‍यापैकी चढया आवाजातच ग्प्पा मारत होतो कारण आमच्या चर्चेचा विषय सर्वसाधारणतः सार्वजनिकच होता. गप्पा मारता- मारता मी माझ्या हातातील कवितांची वही चाळ्त होतो वही चाळ्ता- चाळ्ता मला त्या वहीत मला नकोसं झालेल एक पान दिसलं. मी सवयीप्रमाणे ते पान फाडलं आणि त्याचा गोळा तयार केला. तो खंर म्ह्णजे मी बसच्या खिडकीतून बाहेरच फेकणार होतो पण तो फेकण्यापुर्वीच नीलम मला म्ह्णाली ‘तो कगदाचा गोळा खिडकीच्या बाहेर फेकू नको हा ! त्यानंतर तिने मला स्वच्छ्तेवर एक व्याख्यानच दिलं. माझ्याकडे ते ऐकाण्याखेरीज पर्यायच नव्ह्ता. आजुबाजुच्या तरूणी माझ्याकडे पाह्त गाळात गोड हसत होत्या.

त्यांच्यासमोर उगाच आपला पोपट व्हायला नको म्ह्णून वेळ मारूण नेण्यासाठी मी नीलमला म्ह्णालो,’ अग ! तो गोळा मी माझ्या खिशात ठेवणार होतो आणि बसमधून उतरल्यावर कचराकुंडीत टाकणार होतो. तो कागदाचा गोळा मी खरोखरच माझ्या खिशात कोंबळा. तेंव्हा ती शांत झाली. खरं म्ह्णजे तेंव्हा मला तिचा राग यायला हवा होता पण नाही ! मला तिच्याबद्दल अभिमानच वाटला . स्वच्छ्तेबाबता ही जागरूकता खरं म्ह्णजे प्रत्येकानेच दाखवायला ह्वी आणि तशी ती दाखविली गेली असती तर मुंबई आज स्वच्छ शहरांच्या यदीत असती. आता काळ्चाच प्रसंग बसमध्ये माझ्या पुढे बसलेला माणूस चालत्याबसमध्ये सतत खिडकीतून बाहेर थुकत होता आणि वार्‍यामुळे ती थुकी त्याच्या मागच्या सीटवर बसलेल्या माझ्यावर उडत होती मला तर वाटत होत उटून त्याच्या कानाखाली आवाज काढावा पण तसं करण्याचा माझा स्वभाव नसल्यामुळे मी गप्प बसलो. माझ्या सोबत चालणारा माणूस रस्त्यात थुकला तर त्याला तस न करण्याबाबत मी स्पष्टच बजावतो. पान खाऊन रस्त्यावर थुंकणार्‍यांचा तर मला भयंकर राग येतो. सार्वजनिक वाह्ने चालविणार्‍या चालकांचा पान खाऊन रस्त्यावर थुंकण्यार्‍यात भरणा असतो. वाह्नातून प्रवास करताना सर्रास लोकांना नको असलेल्या वस्तू खिडकीतून बाहेर फेकण्याची सवय असते. आपल्या घराच्या स्वच्छ्तेबाबत जागरूक असणारी लोक आपल्या शहराच्या बाबतीत तितकेच जागरूक का नसतात तेच कळ्त नाही.
हल्लीच मी राह्त असलेल्या परिसरात मी एक कचरा कुंडी पाहिली तर संपूर्ण कचराकुंडी रिकाम्या शहाल्यांनी भरली होती आणि कचर्‍याचा ढीग कचराकुंडीच्या बाहेर साचला होता. बहुदा हा नेहमीचाच प्रकार असावा. कचराकुंडीच्या बाहेर फेकलेला कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्थ पसरलेला होता. त्यात काही सुशिक्षीत महिला अगदी सहज कचराकुंडीच्या बाहेर रस्त्यावर कचर्‍याचा डबा रिकामा करून जात होत्या तेंव्हा मला नीलमची आठवण आली आणि मी स्वतःशीच म्ह्णालो आज जर ती माझ्या जागी असती तर काय म्ह्णाली असती ? आज मुंबईत लोक राहतात करोडोंच्या घरात पण का कोणास जाणे ते हे विसरतात अरोग्य बिगडविण्यास कारणीभूत ठरणारी अस्वच्छ्ता आणि अस्वच्छ ह्वे पासून त्यांना ते करोडोच घर वाचवू शकणार नाही. शहराच्या स्वच्छतेबाबत गरीब – श्रीमंत सर्वांनीच जागरूकता दाखविण्याच आज नितांत आवश्यकता आहे. मुंबईला स्वच्छ शहर करण्याच्या दिशेने मी माझं एक पाऊल त्याच दिवशी उचललं होत ज्या दिवशी तो कागदाचा गोळा मी माझ्या खिशात कोंबला होता आणि नंतर कचराकुंडीत टाकला होता. दमदाटी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या कृतीतून लोकांना स्वच्छ्तेच महत्व पटवून दयायला हवे ! प्रत्येक वेळी महानगरपालिकेकडे बोट दाखविण्यापेक्षा आपण ही कधी तरी हातात झाडू घेऊन गाडगेबाबांना स्मरायला हवे…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..