नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

पटकथाकार ग. रा. कामत

ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. […]

ज्ञानदीपकार आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद

नागपूर आकाशवाणी केंद्रावर कार्यरत असलेले आनंद देशपांडे मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यावर मुंबई केंद्रावर रुजू झाले. सुरुवातीला ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘शालेय चित्रवाणी’ अशा कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. मात्र, त्यांनी निर्मिती केलेल्या ‘ज्ञानदीप’ने त्यांना घरांघरात पोहोचवले. […]

अभिनेत्री अभिज्ञा भावे

मुविंग आऊट या वेब सिरीज मधून तिने वेब दुनियेत पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अभिज्ञा भावेच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला. […]

फिनोलेक्सचे उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रल्हाद पी छाब्रिया

भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली. […]

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला. गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम […]

श्रीलंकेचा खेळाडू अजंता मेंडिस

मेंडीसच्या बॉलिंगने मोठ्या फलंदाजांना देखील हैराण केलं होतं. वीरेंद्र सेहवागने मात्र मेंडीसच्या बॉलिंगवर फटकेबाजी करत पहिल्यांदा त्याची दहशत संपवली होती. […]

अमूल गर्ल चे निर्माते युस्टस फर्नाडिस

‘एएसपी’ या जाहिरात कंपनीचे कार्यकारी संचालक सिल्वेस्टर दाकुन्हा यांनी १९६६ साली अमूल बटरच्या जाहिरातीची जबाबदारी घेतली. १९४५ सालीच अमूल बटरची एक जाहिरात तयार करण्यात आली होती पण लोकांना ती आवडली नव्हती. दाकुन्हा यांनी आयकॉन बदलण्याचे ठरविले. भारतीय ग्राहकांना आपला वाटेल असा चेहरा जाहिरातीद्वारे या दोघांना लोकांसमोर आणायचा होता. हे आपलेपण एका लहान मुलीशिवाय दुसरे कोण निर्माण करु शकणार? यावर दोघांचे एकमत झाले व या मुलीचा जन्म झाला. […]

पत्रकार विनोद दुवा

अमोघ वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. त्यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही सारख्या वृत्त वाहिन्यांमध्ये राजकीय विश्लेषण केलं आहे.१९९१मध्ये प्रसार भारतीवर त्यांनी निवडणुकांचं विश्लेषणही केलं होतं. […]

भारताची पहिली ‘वॉल’ विजय हजारे

विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली. […]

नवाकाळचे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर

आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट, सदानंद, आजकाल या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या. […]

1 60 61 62 63 64 378
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..