नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ज्येष्ठ गायिका कांचन शहा

ह्या जोडीने भारतातला हा गुजराथी लोकसंगीताचा प्रकार जगभर प्रसिद्ध केला, नुसताच प्रसिद्ध केला नाही तर डिस्को दांडिया ह्या संगीत प्रकाराचा जन्म किंवा उगम ह्या बाबला व कांचन ह्या जोडीने च केला. […]

कवी प्रभाकर बरवे

बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला! […]

दानशूर समाजसेवक भागोजी बाळूजी कीर

दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं. […]

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक व पहिले संचालक दिग्दर्शक पी के नायर

भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत. […]

प्रसिद्ध प्रख्यात गणिती आणि भूगोलतज्ज्ञ मर्केटर गेरहार्ट

मर्केटर गेरहार्ट यांना नकाशा शास्त्राचे जनक मानले जाते. टॉलेमी यांच्या जगाच्या नकाशाची मदत घेऊन १५३८ मध्ये मर्केटर गेरहार्ट यांनी जगाचा नकाशा तयार केला. १५४१ मध्ये १.३० मीटर परिघाचा पृथ्वीचा गोल करून त्याच धर्तीवर १५५१ मध्ये गेरहार्ट यांनी तारामंडळाचा गोल बनविला. […]

पुण्याचे पहीले आयुक्त सदाशिव गोविंद बर्वे उर्फ स गो बर्वे

१९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले. […]

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. १९८५ मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९९२ पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. १९९९ साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेले. […]

विधानसभेतील पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी

रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम कृष्णाची जोडी होती ती आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी ) कृष्णराव भेगडे कॉंग्रेस मध्ये गेले परंतु रामभाऊ अखेर पर्यंत जनसंघ– जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले त्यांचे साधी राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले. […]

कोटक महिंद्राचे मुख्य संचालक उदय कोटक

वडिलांनी विचारले मग तुला काय हवे आहे? उदय म्हणाले, मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.त्याच कार्यालयात ३०० चौ.फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्यावेळी टाटाची एक कंपनी नेल्कोची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीची त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८० मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्त्रोत मिळाले. […]

1 59 60 61 62 63 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..