नवीन लेखन...

कोटक महिंद्राचे मुख्य संचालक उदय कोटक

कोटक महिंद्राचे मुख्य संचालक उदय कोटक यांचा जन्म १५ मार्च १९५९ रोजी झाला.

पाकिस्तानातून भारतात आलेले कोटक कुटुंब कापड बाजारपेठेतील मोठे व्यापारी होते. त्यावेळी त्यांचे परदेशी व्यावसायिकांशी संबंध होते. उदय यांचे काका आणि धीरुभाई अंबानी यांची मैत्री होती.काकांचे पोलंडमध्ये कार्यालय होते. निर्यात व्यवसायामध्ये असलेले काका व धीरुभाई पोलंडला जात होते तेव्हा सोबतच थांबत होते. उदय यांना कॉन्व्हेन्टमध्ये प्रवेश देण्याइतपत कुटुंबाची आर्थिक संपन्नता होती. मात्र, वडील गांधीवादी होते, त्यामुळे शिक्षण हिंदी विद्याभवनमध्ये झाले. त्यांच्या शाळेचे उद्घाटन माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केले होते.

उदय यांना यानंतर सिडनेहम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिथेही त्यांनी चकम दाखवली. क्रिकेट आणि सतारची आवड असणार्याल उदय यांना १९७९ मध्ये क्रिकेट खेळताना चेंडू डोक्याला लागला. डॉक्टरांनी ब्रेन हॅमरेज झाल्याचे सांगितले. तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये वर्ष वाया गेले. मात्र, त्यानंतर दिलेल्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात अव्वल क्रमांक पटकावला. पुढे जमनालाल बजाज कॉलेजमधून एमबीए केले.

मुंबईच्या फोर्ड भागातील नवसारी इमारतीमध्ये त्यांचे वडिलोपार्जित कार्यालय होते. उदय तिथे नियमित जाऊ लागले. मात्र, ते तिथे रमले नाहीत. त्यांना कापड व्यवसाय सोडून हिंदुस्तान लिव्हरमध्ये नोकरी करणची इच्छा झाली. नोकरीतून काही साध्य होणार नाही, असा सल्ला वडिलांनी त्यांना दिला. त्यावर उदय म्हणाले,एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या व्यवसायात काम करताना प्रत्येक निर्णयासाठी प्रत्येकाची संमती घ्यावी लागते, त्यामुळे मी काम करू शकत नाही. वडिलांनी विचारले मग तुला काय हवे आहे? उदय म्हणाले, मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.त्याच कार्यालयात ३०० चौ.फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्यावेळी टाटाची एक कंपनी नेल्कोची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीची त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८० मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्त्रोत मिळाले.

१९८५ मध्ये नशीब फळफळल्याची त्यांची भावना आहे. ग्रिंडलॅजच्या सिडनी पिंटोनी स्वत:चा वित्त व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. याचवर्षी आनंद महिंद्रा यांच्याशीही चर्चा झाली. त्यांच्या अगीन महिंद्रासाठी उदय यांनी वित्त पुरवठा केला होता. आनंद यांनीही त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी आनंद महिंद्रा यांच्या मदतीने १९८६ मध्ये ३० लाख रुपयांत कंपनी सुरू केली. कोटक महिंद्रची सुरुवात २८ वर्षापूर्वी अशा पद्धतीने झाली. अनिल अंबानी यांच्या लग्नात उदय यांची भेट एफडी व्यवसायाची संकल्पना संपुष्टात आणू पाहणार्याल एका मित्राशी झाली. उदय यांनी त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेतले. दलाल स्ट्रीटवर कार्यालय घेतले आणि पाच वर्षांत कोटक महिंद्रा मर्चंट बँकिंगमध्ये आली. १९९१ मध्ये कंपनीचा पब्लिक इशू आला. यानंतर उदय यांनी गोल्डमन सॅकच्या हेंग पॉलसनसोबत करार केला.

उदय कोटक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..