नवीन लेखन...

विधानसभेतील पहिले आमदार रामभाऊ म्हाळगी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार रामचंद्र काशीनाथ म्हाळगी उर्फ रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म ९ जुलै १९२१ रोजी पुणे येथे झाला.

रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. रामभाऊ म्हाळगी यांच्या आईचे ते ११ वर्ष्याचे असताना निधन झाले. शाळेत स्थानिक भाषेच्या अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील सरस्वती मंदिर शाळेत प्रवेश घेतला आणि एका शैक्षणिक वर्षामध्ये 3 मानके उत्तीर्ण केले, प्रथम मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

१९३९ साली रामभाऊ म्हाळगी आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) शी जोडले गेले. मॅट्रिकनंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी राहण्याऐवजी, केरळ येथे जाऊन आरएसएसचा प्रचारक काम करण्यास सुरवात केली. जेव्हा १९४८ साली आरएसएसवर बंदी आली तेव्हा रामभाऊ भूमिगत झाले आणि अन्याय विरोधात आंदोलन चालू ठेवले. बंदी उठवल्यानंतर ते पुण्यात परत गेले, तेथे त्यांनी एलएलबी आणि एमए दोन्ही पदवी मिळविली आणि बार कौन्सिलची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (आरएसएसची विद्यार्थी शाखा) आणि नंतर जनसंघ (आरएसएसच्या तत्कालीन राजकीय शाखा) च्या जबाबदारी सोपवण्यात आली आणि महाराष्ट्रातील पक्षाचे कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली.

रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम कृष्णाची जोडी होती ती आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी ) कृष्णराव भेगडे कॉंग्रेस मध्ये गेले परंतु रामभाऊ अखेर पर्यंत जनसंघ– जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले त्यांचे साधी राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले.

पुण्यातून सातत्याने विधानसभा व नंतर ठाण्यातून लोकसभेवर ते निवडून गेले. अनेक विषयावर ते मुद्देसूद चर्चा करीत. त्यांच्या इतके प्रश्न आजपर्यंत विधानसभापटलावर कोणीही मांडले नसतील. मतदारांनी निवडून दिल्यामुळे त्यांच्याबद्दल असलेले उत्तरदायित्व म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वार्षिक कार्यवृत्त अहवाल देण्याची पद्धत सुरू केली. रामभाउंची विधानसभेतील तसेच बाहेरील व्यासपीठावरील भाषणे हि अत्यंत अभ्यासू असत व्यक्तिगत टीका टिपणी ते कधीही करीत नसत. सर्वच पक्षातील नेत्यांचे बरोबर त्यांचे मित्रत्वाचे नाते असे. आमदार तसेच त्यानंतर खासदारपदी निवड झाल्यावर रामभाऊ म्हाळगी यांनी आपल्या काम करण्याच्या शैलीतून विधिमंडळाच्या कामकाजात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. मोठमोठ्या प्रश्नांची अगदी सहजपणे उकल करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे ते संसद गाजवत राहिले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. पुण्यातून ते विधानसभेवर निवडून येत. १९७७ जनता लाटे मध्ये ते ठाणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले १९८० मध्येही ते ठाणे येथूनच निवडून गेले होते.

त्यांच्या नावाने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चालविणेत येते. तसेच त्यांच्या नावाने व्याख्यामालाही चालू अहेत. त्यांच्या नावाचे रामभाऊ म्हाळगी प्राथमिक विद्यालयही आहे.

रामभाऊ म्हाळगी यांचे ६ मार्च १९८२ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..