नवीन लेखन...

नवाकाळचे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर

नवाकाळचे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर यांचा जन्म १५ जानेवारी १९०५ रोजी झाला.

१९२९ मध्ये कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकरांनी सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना १९२७ आणि १९२९अशी दोनदा राजद्रोहाच्या आरोपाखाळी तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागली. त्यांच्या शिक्षेच्या काळात नवाकाळची जबाबदारी यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेबांवर आली. ती त्यांनी समर्थपणे पेलल्यामुळे काकासाहेब तुरूंगातून परत आल्यानंतर देखील नवाकाळचे संपादकपदी आप्पासाहेब कायम राहिले. १९२९ ते १९६८ अशी जवळपास चाळीस वर्षे त्यांनी नवाकाळची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मार्मिक,तर्कशुध्द आणि उपरोधाचा स्वर असलेले त्यांचे अग्रलेख अतिशय लोकप्रिय असत.

चळवळीचं आणि पत्रकारितेचं बालकडू आप्पासाहेबाना घरातच मिळालं. त्यांचे वडील कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या देखरेखी खालील आप्पासाहेबांची पत्रकारिता सुरू झाली. काकासाहेब चळवळीतले कार्यकर्ते. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झालेले आणि केसरीत लोकमान्यांसमवेत काम केलेले काकासाहेब नवाकाळमधून देखील केसरी प्रमाणेच भूमिका पार पाडत होते. स्वाभाविकपणे वारंवार त्यांना सरकारी रोषाला बळी पडावं लागायचं. सरकारला भारी रक्कमेचे जामिन द्यावे लागायचे.त्यामुळे नवाकाळला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. मात्र अगोदर काकासाहेबांनी आणि नंतर आप्पासाहेबांनी नवाकाळला हातच्या फोडासारखे जपत आणि खिश्याला तोषिश सहन करीत नवाकाळचे प्रकाशन बंद पडणार नाही याची काळजी घेतली. स्वांतत्र्योत्तर काळात मुंबईत नवनव्या भांडवलदारी वृत्तपत्रांचा उदय झाला. स्पर्धा वाढली. त्यामुळे नवाकाळला आर्थिक संकटाचा मुकाबला करावा लागला.आप्पासाहेबांनी हे सारे सहन करीत नवाकाळ निष्ठेने चालू ठेवला. हे करताना वृत्तपत्रिय स्वातंत्र्य आणि ते टिकविण्यासाठी लागणारा स्वाभिमान कधी ढळू दिला नाही. कॉग्रेसच्या विचारांचा पुरस्कार हे नवाकाळचे प्रथमपासूनचे धोरण होते. आप्पासाहेबांनी त्यात बदल केला नाही. असे असतानाही कॉग्रेसच्या ज्या गोष्टी पटणाऱ्या नव्हत्या त्यावर टीका करताना आप्पासाहेबांच्या लेखणीनं कधी भिडमुर्वत बाळगली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर नवाकाळने कणखरपणे कॉग्रेसच्या धोरणास विरोध करून ठाम आणि निर्धारपूर्वक महाराष्ट्राची बाजू मांडली होती.

१९४२-४३ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. १९४४ मध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट, सदानंद, आजकाल या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या.

आप्पासाहेब खाडिलकर यांचे ११ मार्च १९७९ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..