नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

नवाकाळचे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर

आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट, सदानंद, आजकाल या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या. […]

आर्यभट्ट मोहिमेचे प्रमुख डॉ. उडुपी रामचंद्रराव

आर्यभट्ट हा भारताच्या पहिला उपग्रह राव यांच्या कार्यकाळातच अवकाशात पाठवण्यात आला होता. आर्यभट्ट मोहीम यशस्वी होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात राव यांना अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. […]

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे

राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले. […]

रशियन-अमेरिकन लेखिका आणि तत्त्वज्ञ आयन रँड

आयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲ‍टलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲ‍टलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे. […]

पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा बेगम

फ्रान्सचा जॉर्ज मेलिएस हा फन्टासी चित्रपटाचा जनक मानला जातो. याच धर्तीवर फातिमा बेगम यांना भारतीय फन्टासी चित्रपटाचे श्रेय देण्यात यायला काहीच हरकत नाही. निर्माती, अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून “बुलबुल-ए-परीस्तान” “हिर रांझा”, “नसीब की देवी”, “चंद्रावली”, “कनकतारा”, “शंकुतला” “मिलन” आणि “गॉडेस ऑफ लक” हे सर्वच मूकपट त्याकाळी खूप गाजले. खरे तर १९२० चे दशक स्त्रियाच नाही तर पुरुषांनीही चित्रपटात काम करणे यानां मान्यता देणारे नव्हते त्यामुळे अशा पार्श्वभूमिवर फातमा बेगम सारखी सनातनी मुस्लिम कुटूंबातील स्त्री येथे येऊन निर्माती, लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करते ही खरोखरच कौतुकांची व विचार करण्यासारखी बाब आहे. आज चित्रपटसृष्टीतील स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या मागे जे प्रेरणास्त्रोत असतात ते फातमा बेगम सारख्या जिद्दी स्त्रीचे. १९३८ चा “दुनिया क्या कहेगी” हा त्यांचा शेवटचा चित्रपट. […]

कवी प्रा. अशोक बागवे

आलम, आज इसवीसन, गर्द निळा गगनझुला, मंदीला हे काव्यसंग्रह, असायलम, आमचे येथे श्रीकृपेकरुन, राधी यांसारखी राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं; मृतिकाघट, अश्वत्थामा, माचिस यांसारख्या एकांकिका असं विपुल लेखन त्यांनी आजवर केलं आहे. तसंच सुमारे ५० चित्रपटांसाठी बागवे यांनी गीतलेखन केलं आहे. […]

अमेरिकन मार्शल आर्ट अभिनेता चक नॉरीस

‘वे ऑफ द ड्रैगन’ मध्ये चक नॉरीस यांनी ब्रूस ली यांच्या बरोबर काम केले होते. ‘कोड ऑफ साइलेंस’, ‘द डेल्टा फोर्स’ व ‘फायरवॉकर’ हे त्यांचे इतर गाजलेले चित्रपट. […]

मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक हरी नारायण उर्फ ह.ना.आपटे

ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. […]

कविवर्य वि. वा. शिरवाडकर

कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नण असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस […]

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधराराजे शिंदे

राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत. […]

1 62 63 64 65 66 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..