नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

श्रीलंकेचा खेळाडू अजंता मेंडिस

मेंडीसच्या बॉलिंगने मोठ्या फलंदाजांना देखील हैराण केलं होतं. वीरेंद्र सेहवागने मात्र मेंडीसच्या बॉलिंगवर फटकेबाजी करत पहिल्यांदा त्याची दहशत संपवली होती. […]

अमूल गर्ल चे निर्माते युस्टस फर्नाडिस

‘एएसपी’ या जाहिरात कंपनीचे कार्यकारी संचालक सिल्वेस्टर दाकुन्हा यांनी १९६६ साली अमूल बटरच्या जाहिरातीची जबाबदारी घेतली. १९४५ सालीच अमूल बटरची एक जाहिरात तयार करण्यात आली होती पण लोकांना ती आवडली नव्हती. दाकुन्हा यांनी आयकॉन बदलण्याचे ठरविले. भारतीय ग्राहकांना आपला वाटेल असा चेहरा जाहिरातीद्वारे या दोघांना लोकांसमोर आणायचा होता. हे आपलेपण एका लहान मुलीशिवाय दुसरे कोण निर्माण करु शकणार? यावर दोघांचे एकमत झाले व या मुलीचा जन्म झाला. […]

पत्रकार विनोद दुवा

अमोघ वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. त्यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही सारख्या वृत्त वाहिन्यांमध्ये राजकीय विश्लेषण केलं आहे.१९९१मध्ये प्रसार भारतीवर त्यांनी निवडणुकांचं विश्लेषणही केलं होतं. […]

भारताची पहिली ‘वॉल’ विजय हजारे

विजय हजारे यांची कसोटी कारकीर्द काहीशी उशिरा म्हणजे ३१व्या वर्षी सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या वाटयाला ३० कसोटी सामनेच आले. तरीही त्यांनी छाप पाडली. […]

नवाकाळचे दुसरे संपादक यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर

आप्पासाहेब खाडिलकर साहित्यिकही होते.त्यांनी संसारशकट, सदानंद, आजकाल या तत्कालिन समाजस्थितीचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या देखील लिहिलेल्या होत्या. […]

आर्यभट्ट मोहिमेचे प्रमुख डॉ. उडुपी रामचंद्रराव

आर्यभट्ट हा भारताच्या पहिला उपग्रह राव यांच्या कार्यकाळातच अवकाशात पाठवण्यात आला होता. आर्यभट्ट मोहीम यशस्वी होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात राव यांना अनन्य साधारण महत्त्व दिले जाते. […]

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे

राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले. […]

रशियन-अमेरिकन लेखिका आणि तत्त्वज्ञ आयन रँड

आयन रँड यांची सर्वात जास्त गाजलेली ‘ॲ‍टलास श्रग्ड’ ही कादंबरी १९५७ मध्ये प्रकाशित झाली. ॲ‍टलास हे स्वतःच्या खांद्यावर पृथ्वी तोलून धरणारे ग्राीक पुराणकथेतील पात्र. या कादंबरीत जग तोलून धरणाऱ्या आदर्शवत मानवांची अशीच कल्पना केली आहे. त्यांनी एखाद्या क्षणी जर ही जबाबदारी नाकारली आणि खांद्यावरील ओझे झटकले तर काय.. मात्र हे आदर्श पूर्णपणे वस्तुनिष्ठतावादाला धरून आहेत. हे काही पारंपरिक नैतिक कसोटीवरचे सामाजिक धार्मिक आदर्श नव्हेत! स्वार्थ, आत्मकेंद्रित असणे म्हणजे पाप नाही हे यात ठासून सांगितले आहे. […]

पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा बेगम

फ्रान्सचा जॉर्ज मेलिएस हा फन्टासी चित्रपटाचा जनक मानला जातो. याच धर्तीवर फातिमा बेगम यांना भारतीय फन्टासी चित्रपटाचे श्रेय देण्यात यायला काहीच हरकत नाही. निर्माती, अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून “बुलबुल-ए-परीस्तान” “हिर रांझा”, “नसीब की देवी”, “चंद्रावली”, “कनकतारा”, “शंकुतला” “मिलन” आणि “गॉडेस ऑफ लक” हे सर्वच मूकपट त्याकाळी खूप गाजले. खरे तर १९२० चे दशक स्त्रियाच नाही तर पुरुषांनीही चित्रपटात काम करणे यानां मान्यता देणारे नव्हते त्यामुळे अशा पार्श्वभूमिवर फातमा बेगम सारखी सनातनी मुस्लिम कुटूंबातील स्त्री येथे येऊन निर्माती, लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करते ही खरोखरच कौतुकांची व विचार करण्यासारखी बाब आहे. आज चित्रपटसृष्टीतील स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या मागे जे प्रेरणास्त्रोत असतात ते फातमा बेगम सारख्या जिद्दी स्त्रीचे. १९३८ चा “दुनिया क्या कहेगी” हा त्यांचा शेवटचा चित्रपट. […]

कवी प्रा. अशोक बागवे

आलम, आज इसवीसन, गर्द निळा गगनझुला, मंदीला हे काव्यसंग्रह, असायलम, आमचे येथे श्रीकृपेकरुन, राधी यांसारखी राज्यनाट्यस्पर्धा पारितोषिक विजेती नाटकं; मृतिकाघट, अश्वत्थामा, माचिस यांसारख्या एकांकिका असं विपुल लेखन त्यांनी आजवर केलं आहे. तसंच सुमारे ५० चित्रपटांसाठी बागवे यांनी गीतलेखन केलं आहे. […]

1 64 65 66 67 68 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..