नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, कॉपीराइट दिन आणि नाटककार शेक्सपिअर यांचा जन्म आणि स्मृतीदिन

वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणाऱ्यांना नक्कीच आणता येईल. […]

गायक उस्ताद बडे गुलामअली खान

जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले. […]

नाटककार विल्यम शेक्सपिअर

त्याच्या ३८ नाटकांपैकी १० ऐतिहासिक नाटके आहेत, १६ सुखात्मिका आहेत तर १२ शोकात्म नाटके आहेत. त्याची अगदी प्रारंभीची नाटके म्हणून ‘रिचर्ड तिसरा’ व ‘हेन्री सहावा’ ही ऐतिहासिक नाटके ओळखली जातात. त्याच्या अनेक नाटकांच्या नेमक्या लेखनवर्षांबद्दल मतभेद असले तरी सर्वसाधारणपणे ‘टायटस ॲ‍टड्रोनिकस’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ व ‘टेमिंग ऑफ द श्र्यूय’ ही नाटके त्याच्या उमेदवारीच्या काळातील मानली जातात. […]

जागतिक पुस्तक दिवस

आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळेनसा झाला आहे. […]

ब्राझीलियन फुटबॉलपटू काका

काका हा २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा व त्याच साली फीफाचा सर्वोत्तम खेळाडू (‘प्लेअर ऑफ द इयर’) या पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू होत. त्याला हा पुरस्कार देण्यासाठी स्वत: पेले हजर होते, हा ब्राझीलच्या फुटबॉलचा मान म्हणायला हवा. […]

अमेरिकेचे ३७ वे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन

१९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हियेत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११ च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. […]

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

जम्मू-काश्मीरमधील बटालियनचं नेतृत्व केल्याबद्दल – सेना पदक, आसाम रायफल्सचे महानिरीक्षक (उत्तर) म्हणून नागालँडमधील सेवेसाठी – विशिष्ट सेवा पदक, स्ट्राईक कॉर्प्सचं नेतृत्त्व केल्याबद्दल – अतिविशिष्ट सेवा पदक, आर्मी ट्रेनिंग कमांडमध्ये GOC-in-C म्हणून सेवा केल्याबद्दल – परम विशिष्ट सेवा पदक अशी लेफ्टनंट जनरल नरवणेंना पदके मिळाली आहेत.नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. […]

पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी

सध्या झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात होती. त्यात एक गुरुजी कथेच्या सुरुवातीचा भाग विस्तार स्वरूपात सांगत असत. या मालिकेचे सूत्रसंचालन भगरे गुरुजी करत असत. या अगोदर झी मराठी वाहिनीच्या “राम राम महाराष्ट्र” च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून भगरे गुरुजी ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले. त्यामुळे भगरे गुरुजी सर्वांच्याच परिचयाचे आहेत. […]

ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम

एक शून्य शून्य या मालिकेने त्यांना ओळख दिली. मराठी नाटक, मालिका, काही चित्रपट असा प्रवास सुरु असताना १९९८ मध्ये सीआयडी या मालिकेसाठी बोलावणे आले. ‘एक शून्य शून्य’ पासून ते बी. पी. सिंह यांच्याकडं काम करीत त्यांची टीव्हीवरची नव्वद टक्के कारकीर्द बी. पी. सिंहांच्यासोबत घडलीय. पाच मराठी सिरियल्स त्यांनी दिग्दर्शित केल्या. त्या सगळ्या सिरियल्स मध्ये शिवाजी साटम यांनी काम केले आहे. अगदी ‘आहट’पासून ते ‘सीआयडी’पर्यंत. […]

आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा.अशोक केळकर

अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ ॲ‍न्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली आहे. ते भाषाविज्ञानामध्ये एम.फिल. आणि पीएच.डी. करणार्याक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत. आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर यांना त्यांच्या कामगिरीबद्दल साहित्य अकादमी, पद्मश्री आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. […]

1 46 47 48 49 50 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..