नवीन लेखन...
नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

हाॅटेलिंग आणि मला न प(च)टलेल्या खाण्याच्या माॅडर्न पद्धती

ग्लोबलायझेशनमुळे मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला व सहाजिकच त्या पैशाला खर्च करण्याचेही मार्गही निघू लागले. माझ्या पिढीचा बचतीकडे असणारा कल, नविन पिढीत खर्च करून उपभोग घेण्याकडे वळू लागला. पैसे साठवण्यासाठी नसून खर्च करणासाठी असतात ह्या विचाराने आता चांगलंच मुळ धरलंय. पैसे खर्च करायच्या नविन मार्गात हाॅटेलिंग हा चवदार प्रकार हल्ली भलताच लोकप्रिय आहे. हल्ली नवरा […]

दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे

१६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत ‘लोखंडी रस्त्या’वरून ‘आगीची गाडी’ गाडी धावली आणि मुंबई ‘महा मुंबई’ म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे ‘हिराॅईन्स’चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली. मुंबईच्या अशा दोन […]

सरकारनं लाल दिवा काढला, आता हे ही करावं

केंद्र सरकारने काही ठराविक सेवा वगळल्यास सर्वच मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला हे अतिशय उत्तम काम केलं. सामान्य जनतेच्या भावना सरकार ओळखू शकलं याचा अर्थ सरकारची जनतेशी नाळ जुळली आहे असा होतो. आता सरकारने आणखी एक काम करावं. ‘भारत सरकार’ किंवा ‘मबाराष्ट्र शासन’ असं मराठी-इंग्रजीत मागे-पुढे लिहिलेल्या अनेक सरकारी व खाजगी गाड्या दिसतात. […]

भुमिकांची अदलाबदल

आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही. समोरच्या माणसाची भुमिका समजून घेण्यासाठी थोडासा परकाया प्रवेशाचं कौशल्य अंगी असावं लागतं आणि ते प्रयत्नाने सहज साध्य […]

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे

गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला. कार्यक्रम होता बोरिवलीच्या ‘जनसेवा केंद्रा’ने आयोजित केलेला जगद्विख्यात सिद्धहस्त चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या सत्काराचा आणि तो ही साक्षात परमपुजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनराव भागवतांच्या […]

गाढवं; बांधुनही न बांधलेली

कबीराने एका रचनेमध्ये गाढवांना बांधण्याच्या पद्धतीची माहिती दिली आहे, ती मनोज्ञ आहे.. …गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं. …शहाणा कुंभार गाढवांना जोडीजोडीने बांधतो… म्हणजे त्यांना खुंटीला बांधत नाही, एकमेकांशी बांधतो. गाढवं जागची हलत नाहीत. हलूच शकत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही […]

देवांचा राजा ‘माणूस’च

आज श्रीराम नवमी. मर्यादा पुरुषोत्तम रामाची महती सांगणारे अनेक मेसेज अनेकांडून प्राप्त झाले. मला त्यात मात्र गम्मत दिसली. आपण किती स्टिरिओटाईप वागतोय याचं उदाहरण म्हणजे अशा शुभदिवशी आपल्या मोबाईलमधे येणारे अनेक उत्तमोत्तम मेसेज. आता यात गम्मत अशी, की ‘मर्यादापुरुषोत्तमा’ची फाॅरवर्डेड महती सांगणारे मेसेज पाठवणारे असे किती जण प्रत्यक्ष आयुष्यात ‘मर्यादापुरूषोत्तमा’ची भुमिका खरोखरंच बजावत असतात. माझ्या मते […]

गुढी पाडवा

‘गुडी पाडवा’. हिन्दू नववर्षाचा प्रथम दिवस. ‘गुढी पाडवा’ या शब्दातला ‘पाडवा’ हा शब्द, तिथी ‘प्रतिपदा’चं अपभ्रंशीत रुप आहे. ‘गुढी’ या शब्दाचा जन्म कसा झाला असावा याचा शोध घेताना काही मनोरंजक माहिती मिळत गेली. या शब्दाचा शोध सुरू केला तो श्री. कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘मराठी व्युत्पत्ती कोशा’पासून व त्याला जोड म्हणून ज्येष्ठ संशोधक श्री. दामोदर कोसंबीचं […]

गुढी पाडवा आणि शोभायात्रा नव्हे, ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’

नववर्ष स्वागताच्या या यात्रेला ‘शोभायात्रा’ असं शोभेचं ‘दिखावू’ नांव देऊन उगाच आपली शोभा करून घेऊ नका. या ऐवजी या यात्रेला ‘हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा’ असं खणखणीत नांव द्या. […]

1 20 21 22 23 24 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..