नवीन लेखन...

आट्यापेक्षा मैदा अधिक लवचिक का?

मैदा आणि आटा हे दोन्ही गव्हापासूनच तयार केले असतात. पण मैद्याची कणीक भिजवून त्याचे भटुरे लाटणं आणि आटयाची कणीक वापरून त्याच्या पोळ्या लाटणं हे दोन अगदी वेगळे अनुभव असतात. मैद्याची गोळी पोळपाटावर ठेवून, कितीही लाटली तरी फारशी पसरत नाही. सारखी आपली आक्रसून जवळ येत रहाते. त्याउलट आट्याच्या गोळ्यावर अगदी अलगद लाटणं फिरवलं तरी आपल्या मनपसंद पातळ पोळी सहज लाटता येते.

तेव्हा मैदा आट्यापेक्षा अधिक लवचिक का असतो या प्रश्नाच्या निमित्ताने दोन गोष्टी लक्षात घेऊया. पहिली म्हणजे आटा म्हणजे अख्या गव्हाचं पीठ! म्हणजे आटा तयार करतांना गव्हाच्या गुलाबी सालासकट त्याचं पीठ केलं जातं. मैदा करतांना गव्हाच्या आतल्या दाण्याचं पीठ करतात.

सालामध्ये असलेल्या तंतूमय घटकांमुळे आटा थोडा खरखरीत असतो. मैद्यामध्ये तंतूमय घटक नसल्यामुळे, त्याचे कण खूपच बारीक आणि गुळगुळीत असतात. परिणामी त्याची कणीक थोडी चिकट, मऊ आणि गुळगुळीत होते. तिला रबरासारखी लवचिकता येते. असं लवचिक पीठ पोळपाटावर लाटतांना त्रासदायक होतं. कधी कधी दिसतांना छान दिसावं म्हणून आट्यामध्ये मैदा मिसळतात, पण गिऱ्हाईकाला त्याविषयी माहिती देत नाहीत. चाणाक्ष गृहिणीला मात्र पोळ्या लाटायला घेतल्या की ही फसवणूक समजते.

एवढंच नाही तर चाणाक्ष गृहिणी स्वयंपाकघरातल्या प्रत्येक पदार्थाची योग्य अशी वाहकता ठरवत असते. आटा थोडा घट्ट भिजवून त्याच्या पुऱ्या किंवा दशम्या करते. पोळ्यांच्या अंगाला लागावी पण भातावर घेतल्यावर ताटभर वाहू नये अशा योग्य त्या वाहकतेची आमटी, भाताच्या मुदीवर चपखल बसणाऱ्या वाहकतेचं वरण, पण आजुबाजूच्या परिसरातल्या पदार्थांची चव न बदलता आपलं पाणी आपल्याबरोबरच ठेवणारी कोशिंबीर! भगिनींनो, आपण जर या सर्व पदार्थांच्या वाहकतेवर हुकुमत गाजवत असाल तर आहात जातीच्या केमिकल इंजिनियर…. कारण केमिकल इंजिनियरिंगमध्ये पदार्थांची वाहकता या विषयांवर खास अभ्यासक्रम असतो बरं!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..