नवीन लेखन...

पायासाठी प्रेशर पाइलिंगची गरज केव्हा पडते?

कोणत्याही इमारतीत आपण राहतो, त्या इमारतीतील आपल्या सदनिकेची जमीन ही खालंच्या सदनिकेच्या डोक्यावर म्हणजे स्लॅबवर असते आणि तुळया या खांबावर आधारलेल्या असतात. आणि प्रत्येक खांब हा त्याच्या पायावर उभा असतो. अशा रचनेमुळे सर्व राहत्या क्षेत्रफळावर व तुळयांवर जेवढे वजन असते, ते स्लॅब-तुळया -खांब- पाया- पायाखालील भूस्तर अशा तऱ्हेने वरून येणारा भार एकाकडून दुसऱ्याकडे सोपवीत असतात. आणि सगळ्यात शेवटी एकूण भार पायाखालील स्तरावर विभागला जातो. पायाखाली जी माती किंवा खडक असेल त्याची न खचता भार सहन करण्याची क्षमता असावी लागते.

ज्याप्रमाणे आपण रस्त्यावर व्यवस्थित चालू शकतो, त्यापेक्षा मंद गतीने आपण समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत चालतो. शिवाय आपल्याला – अडखळायलाही होते, कारण शरीराचा भार पायावर पडतो आणि पाय तर काहीसे वाळूत रुतलेले असतात. वाळूची भार क्षमता रस्त्यापेक्षा 18 कुतूहल कितीतरी कमी असते. ओहोटीच्या वेळी आपण पाणथळ जमिनीवरून समुद्राकडे चालत गेलो तर आपण गुडघ्यापर्यंत आत रुतू शकतो, कारण आपल्या पायाखालील जमीन आपला भार सहन करू शकत नाही. त्याचप्रमाणे इमारतीचा पाया कडक किंवा भुसभुशीत अशा कोणत्याही स्तरावर स्थिर व न खचणारा असावा लागतो.

पायात खडक किंवा मुरुम असेल तर पाईल्सची गरज नसते, पण भुसभुशीत जमीन जर ६, ८ किंवा १० मीटरपर्यंत खोल असेल तर पाईल फाऊंडेशनची किंवा भोक पाडून काँक्रीट ओतण्याची गरज असते. पाईल खडक किंवा अत्यंत कठीण स्तरापर्यंत ठोकाव्या लागतात. यामुळे पायावरील सर्व भार त्याच्या खालील जमिनीवर न पडता पाईलच्या माध्यमातून खडकावर किंवा न खचणाऱ्या स्तरापर्यंत पोहोचविला जातो. त्यावरून खांबावरील भार १० ते १२ मीटर किंवा अधिक खोलीवर पेलला जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..