विज्ञानेश्वर : डॉ. अब्दुल कलाम

`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी योगेश उगले  यांची माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यावरील ही कविता खास वाचकदिनाच्या निमित्ताने…


कधी अंतराळातूनी तारकांच्या
कुळातील तारा अकस्मात येतो
आणि अंध:कारातल्या भारताच्या
नव्या वैभवाचा आविष्कार होतो

जशी ‘पृथ्वी’भारातली क्षेपणास्त्रे
‘आकाशा’त कोरुन ये शक्तीमाला
तशी ‘अग्नि’दिव्यातल्या पर्वकाळी
कलामांसवे देश हा सिध्द झाला

जिथे चालली नित्य तुझी पावले
तिथे निर्मितीची उभी ज्ञानदेवी
रुजे ध्येय राष्ट्रातल्या उन्नतीचे
तुझ्या स्वप्नशिल्पांतली एक ओवी

असे देशकार्याप्रती त्याग मोठा
किती प्रेम विज्ञान-भाषेवरी
जिथे उत्तमाचे आराधन होई
तिथे स्पर्श आहे असा ईश्वरी

अणु’शक्ति’साठी नव्या योजनेने
नवा ध्यास घेऊन उभे ठाकले
समर्थ, सशक्त असा देश व्हावा
म्हणोनि आजन्म प्रबोधन केले

अशी थोर कर्मातली भव्यता ही
उभे राष्ट्र आहे ऋणी सर्वदा
अशी वाट दावी नवी ध्येयगामी
नव्या साधकांना तुझी संपदा

© योगेश उगले
`आम्ही साहित्यिक’ या फेसबुकवरील लोकप्रिय ग्रुपवरील कवी

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुपमधून 60 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

1 Comment on विज्ञानेश्वर : डॉ. अब्दुल कलाम

  1. मराठी साहित्यसृष्टीचे आभार.. माझ्यासारख्या सामान्य कवीची कविता प्रकाशित केल्याबद्दल..! आनंद जाहला 🙏

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..