श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण

वाहूनी कृष्णकमल तव शिरी,
अर्पितो भाव माझे श्रीहरी….।।धृ।।

तू आहेस ईश्वर,
करी सारे साकार
नशिब माझे थोर
मिळे तुझा आधार
सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी….१,

अर्पितो भाव माझे श्री हरी….
विविधतेने नटलेले
कृष्णाचे जीवन गेले
लय लागूनी जगले,
कसे जगावे शिकवले
जीवन सारे असूनी रूप ईश्वरी,  दाखवी स्वानूभवे तो हरी….२

अर्पितो भाव माझे श्री हरी,
रंगीबेरंगी कोमल
कृष्णकमळ फूल
पाकळ्या बघता निल
प्रसन्न चित्त होईल
दरवळू दे कृष्ण कमळा परि,  सेवा भावाचे समाधान उरी…..३,

अर्पितो भाव माझे श्री हरी
राही न्यूनता काही
ही अज्ञानाची ग्वाही
मज क्षमा ती व्हावी
परि आशिर्वाद तू देई
उकलन तव जीवनाची करी,  यशासाठी जावे त्याच वाटेवरी….४

अर्पितो भाव माझे श्री हरी 

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1763 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....