नवीन लेखन...

टप्पू (कथा)

नेहमीप्रमाणे तंद्रीत चाललो होतो
तितक्यात एक गाडी माझ्या जवळून गेली
आणि लगेच थाबली
मी दचकलोच त्या कार ला नेहमीप्रमाणे बी. सी एम सी .करणार होतो
तितक्यात ती कार मागे आली .
कार एक स्त्री ड्राईव्ह करत होती,
काय कसा आहेस. ती म्हणाली
मला काहीच
कळले नाही क्षणभर
पण तिच्या गालावरच्या मोठ्या तिळावरून ओळखले.
अरे टप्पू तू .
तिला कॉलेजमध्ये आम्ही टप्पू म्हणायचो
कारण तिला आम्ही कितीही टाळायचो
पण ती बरोबर टपकायची
म्हणून टप्पू.
बस आत , ती म्हणाली.
कॉलेजनंतर ५ ते ७ वर्षांनी भेटत होतो.
गळ्यात मंगळसूत्र होते म्हणजे
कोणीतरी बकरा सापडला तिला.
चल जरा गप्पा मारू ती म्हणाली
रिकामा आहेस
म्हटले हो , रिकामाच म्हण
माझा स्वतःचा बिझनेस आहे
कधीही वेळ काढू शकतो.
मी गाडीत बसता बसता म्हणालो
आम्ही गाडी एक बागेच्या कडेला लावली. आणि
वॉचमन संगितले लक्ष ठेव तिने
त्याच्या हातावर ५० रुपये ठेवले.
हे बघून लक्षात आले
नवरा मालदार आहे.
मी गॉगल राहिला म्हणून , तिच्याकडून चावी घेतली
दार उघडले , गॉगल घेतला
दाराच्या फटीत एक पाकीट होते,
मी काढले आणि फेकण्यासाठी घेतले तेव्हा लक्षात आले
ते कंडोमचे पाकीट होते,
मी चमकलो ते तसेचं ठेवले.
डॉटेड कंडोमचे होते
जाऊ दे आपल्याला काय करावयाचें
सोडून दिले.
खूप गप्पा झाल्या.
तिनेच नवरा खूप श्रीमंत होता सतत बाहेर जावे लगे.
सर्व काही होते.
ती खूप आंनदी ,धमाल दिसत होती.
मी म्हणालो ही तुझो गाडी की नवऱ्याची
माझ्या डोक्यात ते पाकीट होते.
ही माझी गाडी एकदम स्पेशल.
कुणालाही चालवू देत नाही.
वन हँडेड
वन हँडेड वर तिने जोर मारला होता.
खूप गप्पा झाल्या फोन नंबर दिले घेतले.
चल आपण काही तरी खाऊ
तीच म्हणाली.
हॉटेलमध्ये गेलो,
तिची बडबड काहीच कमी झाली नव्हती.
पण आता तिची बडबड बोअर करत नव्हती
पूर्वी बोअर व्हायची
कारण त्या वेळी वेगळे होते
त्यावेळी आम्हाला कॉलेजमध्ये खूप चॉईस होता
इथे आता एकदम बहुतेक वाळवंटच .
म्हणून बरे वाटत होते.
आम्ही निघालो.
मी इथूनच जातो समोरची रिक्षा पकडून .
मी ड्रॉप करते ना , ती म्हणाली.
म्हणालो मी रहातो तो एरिया गर्दीचा आहे ,
फुकट लटकशील.
ती बाहेर आली.
शेक हॅन्ड केला.
जरा तिने हात जोरानेच दाबला
असे मला वाटले.
ती वळली , तिच्या मागचा पाठीचा पदर
त्यावेळी बाजूला होता
गोरीपान पाठ छान दिसत होती
परंतु त्या तिच्या पाठीवरील असंबद्ध ‘ पांढऱ्या रेषा ‘
मला अस्वस्थ करून गेल्या.
मनात म्हटले परत भेटूच.

सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..