नवीन लेखन...

हिला कुठेतरी पाहिले आहे…

हिला कुठेतरी पाहिले आहे…
लक्षात नाही आले…
मी लांबूनच तिला बघत होतो…बघत बघत
जवळ येऊ लागलो…
ती म्हणाली ..पहेचाना ..
मी असेच उत्तर दिले…..
कैसी हो..आप.
बस वापीस यहा आ गयी इधर धंदा
फिरसे शुरु किया..
१० साल के बाद आयी ..
आणि माझी ट्यूब पेटली..
ती इथेच स्टेशनवर धंदा
करत होती…
पूर्वी मी अशा काही मुलींची मुलाखत
एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात मुलाखत घेतली होती..
मला तिचे नाव आठवत नवहते..
मै रेश्मा..
मला आठवले ..
आजूबाजूचे जाणारे येणारे माझ्याकडे बघत होते,
त्यांना वाटले गिऱ्हाईक आहे.
शेवटी तीच म्हणाली सामनेवाले होटल मे जायगे
मला लोकांची पर्वा नव्हती ,
चल म्हणत मीही एका छोट्या हॉटेल मध्ये शिरलो..
काउंटर वरच्याने दुर्लक्ष केले,
त्याला बहुतेक सवय होती…
वडा-साबार मागवला..
तू वापीस आई..
हा करू क्या..
छोकरा था शादी करके चला गया..
गाव पे मेरा घर है ..
इधर कमाया ..
उधर एकदम साफ थी ..
बच्चा बडा हो गया ..
बस उसने खुद का देख लिया..
मई उधर एकदम साफ थी ..
एकभी मरद को छूने नाही दिया..
तिचे उच्चार वेगळे होते..
फिर इधर क्यू आया..
मई दो महिने के लिये आयी हू..
जरा मजा करुंगी और जाऊंगी
जाते जाते कमाउगी ..
तिची ही फिलॉसॉफी मला कळाली नाही..
मी तिला विचारले…..
खरे कारण विचारले..
ती टाळंटाळ करत होती…
तिचा पत्ता लागत नवहता…
तरी पण विचारले…
तेव्हा ती म्हणाली..
दस साल दवाई खा के जी रही हू…
बहुत सह लिया..
अब जिने का नही….
बस मेरी बेमारी मै यहा बाटना चाहती हू…
यहींच मुझे मिली थी …
माझ्या अंगाचा थरकाप उडाला ..
मी खूप समजावले…..
तशी ती रडू लागली…
जाता जाता म्हणाली सोचूगी..
तीन चार दिवसात…
प्लँटफॉर्मवर गर्दी दिसली…
पोलीस दिसले..
गर्दीत बघीतले तर स्ट्रेचरवर ती होती…
मेलेली..
काय झाले ..मी विचारले..
काय झाले..
धंदेवाले होती..
गाडीखाली उडी घेतली…
माझे पायच लटपटले..
त्याच लटपट्या पायाने ..
समोरच्या बारमध्ये घुसलो…
स्वतःला विसरण्यासाठी….

सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..