नवीन लेखन...

ती अन् मी

आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे. […]

सुंदरतेची मूर्ती

सुंदरतेचा म्हणजे सुंदर दिसण्याचा ध्यास कोणाला नाही? पुरुष असो की स्त्री, लहान असो की मोठा, खेडयातला असो की शहरातला, पैसेवाला असो की गरीब… सुंदर दिसण्याची धडपड सर्वांचीच आणि सर्वकाळ! सर्वकाळ अशासाठी की आजची तरुणी स्वतःला सजवण्यात जशी मग्न तीच वृत्ती रामायण, महाभारतातील स्त्रियांमध्येही होती! प्रसाधनाची माध्यमं बदलली, सौंदर्याचे निकष बदलले पण स्वतःची आरशातली छबी तद्वत लोकांच्या नजरेतली पसंती, छान या सदरात मोडावी, हाच उद्देश ‘सुंदर मी होणार’ ह्यापाठी असतो. […]

कुटुंब की करिअर?

“अभिनंदन सुरुची तुझं प्रेझेन्टेशन फारच मस्त झालंय. तू ज्या गोष्टी आज मांडल्यास त्या ऐकून आपले डायरेक्टर तर फारच खूष झाले. आपल्या कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी तू जमवलेली माहिती आणि संशोधन अतिशय कौतुकास्पद आहे. नवीन प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होणार आणि त्यात तुझा महत्त्वाचा वाटा असणार’. ‘धन्यवाद सुजय… आणि हो… तुझंही अभिनंदन. कारण या प्रोजेक्टचा मॅनेजर तू आहेस… माझे […]

छंद आणि स्त्री

टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं. […]

कुटुंब संस्था आणि स्त्रीचे स्थान

कुटुंब आणि आजची स्त्री या विषयावर लेख लिहिताना प्रथम एक गोष्ट मला आवर्जून नोंदवावीशी वाटते, ती म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढता येत नाहीत, एवढ्या त्या एकरूप झालेल्या आहे. कुटुंबाची व्याख्या एकवेळ पुरुषाशिवाय पुरी करता येईलही, परंतु स्त्रीशिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. […]

प्राचीन साहित्यातील लावण्यवती

स्त्री सौंदर्याचे मुख्य पैलू म्हणजे शरीरयष्टी, कांती, केस, अवयव आणि यौवन, नायिका तन्वी असावी म्हणजे शेलाटी, प्रमाणबद्ध असावी असा आग्रह सगळीकडे दिसतो. त्यामुळेच तिच्या शरीरयष्टीला फुललेल्या, नाजूक वेलीची उपमा नेहमी दिली जाते. एखाद्या कवीला अशी तनुगात्री पाहिल्यावर बीजेची चंद्रकोर आठवते. हंसीसारखी वा शंखासारखी मान, गोलाकार कोमल बाहु, कमळकळीसारखे किंवा कलशासारखे वक्ष, सिंहकटी, नितळ व सपाट पोटावर नाभीचा खोलसर आवर्त, केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, कमळासारखे तळवे आणि पाऊले, चंद्रकोरीसारखी नखे हा भारतीयांच्या दृष्टीकोनातून स्त्रीसौंदर्यांचा आदर्श होता. […]

आधुनिक स्त्री

स्त्री यांना संधी मिळाली की त्या तिचे सोने करतात. स्त्रीशक्तीने आज आपली ताकद दाखविली आहे. आधुनिक स्त्रीचा विचार करताना ती आज लाचार नाही हे सहज दिसते. तिला शिक्षण मिळाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात, विश्वाच्या प्रांगणात तिने पाऊल टाकले. कल्पना चावला व सुनीता विल्यम्स यांनी तर अवकाशाचा वेध घेतला. […]

स्त्री: विविध अनुभूतींनी परिपूर्ण एक अजूबा

‘स्त्री म्हणजे काय आहे?’ या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल. स्त्री म्हणजे एक ‘अजूबा’ आश्चर्य आहे. परमेश्वराची अजोड निर्मिती आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या परिचक्रातील पहिली महत्त्वाची गोष्ट. उत्पत्ती – म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होणे. स्थिती – म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या गोष्टीचे अस्तित्व आणि तिसरी स्थिती – लय म्हणजे एखादी गोष्ट संपून जाणे, विलय पावणे, मृत्यू. सर्व सृष्टी या परिचक्राला बांधलेली आहे. परंतु यातील – निर्मिती, उत्पत्तीची ताकद महत्त्वाची आहे. […]

गरज ई-साक्षरतेची

भारत देश विकासात्मक प्रक्रियेत अग्रेसर होत असून जगातील अर्थव्यवस्थेत तो आपले स्थान भरभक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटलायझेशनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दि. १ जुलै २०१५ पासून भारतात ख-या अर्थाने डिजिटलायझेशनला सुरुवात झाली असे म्हणता येईल. डिजिटल इंडिया असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले. […]

कहाणी साता देवांची

ऐका साती देवांनो तुमची कहाणी. एके दिवशी दिवशी शंकर पार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघाले. एका आटपाट नगरात मुक्कामी उतरले. पार्वती शंकराची पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. शंकराने तिला एका गरिबाच्या बायकोचे बाळंतपण करायला सांगितले. तुझे हाथ कमळासारखे मऊ होतील, असे सांगितले. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..