नवीन लेखन...

मैत्री

मैत्री असते आंबट गोड हृदयाला हृदयाची जोड मैत्री असते मायेची पाखर तुझ्या सुखाला माझ्या आनंदाची झालर मैत्री असते राधाकृष्णाची बासरीच्या सुरात विरघळण्याची मैत्री असते जिवाभावाची मनातले गुपित हळूच ओळखण्याची मैत्री असते हळवे पणाची माझे अश्रु तिने पुसण्याची मैत्री म्हणजे सतारीची तार माझ्या वेदनेचे तुझ्या काळजात झंकार मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा रणरणत्या उन्हात बर्फाचा गोळा -स्वप्ना साठे […]

आठवणींच्या विश्वात

वाळूत ओढत रेघा, मी बसले होते आठवणींच्या विश्वात मी रमले होते. कुठून तरी चाहुल मला लागली दुसरे नव्हते कुणी माझेच मन होते कधी मी मनाला कधी मन मला अनेक आठवणींचे झरे वहात होते आठवणीच्या झऱ्यांनी शब्द मूक झाले बोलण्याचे काम मग अश्रूंनीच केले. – कु. निलांबरी शां. पत्की व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

स्त्री

स्त्री आहे अंबा,दुर्गा आणि काली, अष्टभुजा धारण करणारी रणरागिणी. सांभाळ करून सर्व नात्यांचा प्रेमाने, गाजवते अधिराज्य जगात शक्तीने आणि युक्तीने. बाबांच्या ह्या इवल्याश्या परीने, फुलविला तिचा संसार स्वकर्तृत्वाने. मिळाली देणगी मातृत्वाची हिच्या उदरी, संयमाने करते ती पालनपोषण दिवस-रात्री. शिकवतेस जगाला प्रेम, आपुलकी आणि माया, नाही पडू देत संसारावर कधी दुःखाची छाया . सांभाळताना तुझ्या संसाराचा गाडा, […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..