नवीन लेखन...

जवान

न प्रेम मला पत्नीचे पुत्राचा न मोह मला । दुर्लक्षिलेच मी सुयश प्रसिद्धी- वैभव मान सन्मानाला ॥ जीवनातल्या आनंदोत्कर्षाचे मला न कसले लोभ कशाचे । ध्येय आमुचे, निर्धार आमुचा – देशासाठी बलिदान प्राणांचे ॥ नाव स्मरणाची बातच सोडा, क्षुद्र धूळही जेथे मला विसरते। प्राणांची बाजी लावेन, मेल्यावर पण याद फिरुन कोणाला येते ॥ इतिहासात अमर होईन, […]

मृत्युंजय

अज्ञात दिवा मी मिणमिणणारा संकटाचे येऊ देत वादळी वारे वावटळही ती येऊ दे आणि अंगावर येऊ देत सारे पण मी विझणार नाही मी जागृत रहाणार आहे पेटूनऽ…. पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे जरी मला ज्ञात आहे गेल्यावर मी, फक्त…. दप्तरी नोंद होणार आहे विस्मृती मला घेरणार आहे पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे जन्म-जीवन […]

नैराश्य

मी निराश झालो आहे ।। खाचखळग्यांतून, दगडधोंड्यातून पराभवाच्या अपमानातून शल्य मनातले मनातच ठेवून त्यातून वाट शोधत आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ १ ॥ आत्मविश्वास तो गडबडे ताबा अन् मनावरचा उडे येथेच अडकून घोडे पडे दुःख चावरे त्याचे मला आहे ॥ मी निराश झालो आहे ॥ २ ॥ प्रवास माझा पहाटे धवल यशाच्या धुक्याचे पटल […]

उद्ध्वस्त मने

दुर्दैवाचा नाद निनादे झाकोळून ये आता निराश माझे मन हे गाते मरणाच्या गाथा मरण आहे मिसळून जेथे आयुष्याशी एखाद्या कुणी धराव्या कशास आशा अप्राप्याच्या एखाद्या ॥ १ ॥ मरणास माझ्या मीच जातो हात पसरोनी सामोरा उपेक्षिताचा निर्वाणसोहळा, साक्षीला मी अन् एक कोपरा मनात माझ्या धडपडून आसू जमवू पहातो ओंजळभर गीत माझे तुलाच लिहिले मृत मना हे […]

वैफल्य

निरर्थक शब्दांची दाटी, का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही सजवलेली शय्या, ताटी का होते कुणास ठाऊक काहीच कळत नाही ॥ १ ॥ मनातले उमटत नाही कुणास ठाऊक का म्हणून सुटा पसारा जुळतच नाही कुणास ठाऊक का म्हणून ॥२ ॥ वेड्यागत हव्यास का हा सामान्यतेहून दूर जाण्याचा धडपडूनही जेव्हा फसतो प्रयत्न हिमालयाला छेदण्याचा ॥ ३ ॥ […]

कुणाकुणासाठी कोठपर्यंत…. कुणी का रडावे

कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे! आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून मस्तकाच्या ठिकऱ्या – ठिकऱ्या काळीज माझे छेदून शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे? मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके […]

आता आस उरली नाही

दिसे किनारा, निवता वारा तेवती संध्यादीप काही आता, आस उरली नाही ॥ पूर्वायुष्य या पुसत्या रेषा नव्या धुक्यात अशा विराव्या ना भविष्य, नसे वर्तमान, उगा दुःख काही आता आस उरली नाही ॥ १ ॥ न जगताच जे जगले जीवन, त्यातच मन उबले थरथर मनीची शरीरी उतरुन राही आता आस उरली नाही ॥ ३ ॥ भयाणतेच्या सीमेवरी […]

वेठबिगार

महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला – भागला नि निघतो […]

सत्यकाम

सत्य हे नेहमीच पोरकं असतं माझ्या जीवनात जर तो आला नसता तर कदाचित मीही हे मानलं नसतं पण… तसं व्हायचं नव्हतं अजूनही मला तो आठवतो आहे उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा आणि हो, त्याचे डोळे! त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत तुमच्याशी संवाद साधायला लागायचे सत्याबद्दल त्याला अपार आदर […]

जगरहाटी

मी शांत बसलेला असताना मी एकटा असतो; स्वत:शीच जगापासून दूर… मी जगाचा तिरस्कार करतो हे जग स्वार्थी आहे, ढोंगी आहे भयानक क्रूर आहे, आपमतलबी आहे हे जग माझ्यासाठी नाही मी या जगाचा धि:कार करतो माझ्यापुढे ठाकलेला असतो आदर्शाचा हिमालय सुंदर, स्वच्छ, स्फटिकधवल दूरदूरुन मला खुणावत असतात विवेकानंद, राम नावाची त्या हिमालयाची उंच शिखरे शिवाजीच्या असामान्यतेची विविधरुपे […]

1 2 3 4 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..