नवीन लेखन...

मनातले पडघम

मनामध्ये पडघम सतत वाजतच रहातात काळजाचे करावे कान तेव्हा ऐकू येतात उमटतात त्यात मनाच्या गाभाऱ्यातले नाद खोलवरुन येणारी आपल्या अंतराची साद आयुष्याच्या वाटेवरले काही फुललेले श्वास काळीजकुपीत जपलेले एकले एकले निश्वास् एकमेकांवरचा असलेला गाढासा विश्वास आसपास असण्याचा मग असेना का आभास कधी राहते गुंजत विचारांची निःशब्द गाज उलगडत कधी शब्दांत गुरफटलेली लाज थिरकत थिरकत येणाऱ्या तरलतेचे […]

कोरडे पाषाण

कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे वैराण वाळवंटातील भगभगीत वारे नात्यांचे आखीवरेखीव बंध काही आपुलकीचा आनंद गंध नाही हास्याच्या कृत्रिम कवायती या अंतरीचा त्यात उन्माद नाही भावनांना यांच्या ओल नाही जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही आटलेल्याच मनोनद्या साऱ्या पात्र कुणाचेच खोल नाही आपुलकीची ओसरतीही सर नाही भावनांना कुणाच्याही घर नाही अहिल्याच्या शिळांना तर आता कुणा श्रीरामाचा कर नाही काळजात […]

उपचार सारे

हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही. आण्यांचे […]

शापित आत्मे

स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा अखंड असे […]

हव्यास

रुसवे फुगवे, तंटे बखेडे हवे कशास लढाई झगडे अतीतटीचे हे हेवेदावे आत्यंतिक द्वेषाचा सोस कशाला? ।। आभाळाच्या मुक्ततेला नाही बंध देवाच्या मायेला ना बंधाचा गंध भिंतीआडच्या कृत्रिम जगाचा तुम्हाआम्हाला मग ध्यास कशाला ॥ जमिनीच्या हक्काच्या तुकड्याला कुंपणात जोखण्याचे ध्येय आम्हाला मुक्त हवा करुन कलुषित या छपराखाली कोंडला श्वास कशाला ॥ आयुष्याची वरात ही रिकामहाती घर भरण्याची […]

माझं गुपित

काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥ आहे त्याचा तर आनंद आहे नसत्याची नाही उणीव काही आनंदपरिमल दुःखाची मळमळ कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥ चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून शहाणपण माझं आटोकाट जपत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥ जीवाचा […]

पाय

आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच! पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे […]

आईला

तुमचं आमचं नातं कधी एका जन्माचं गुलाम नव्हतं ऋणं आपली फेडता फेडता बंध पावले गाढ दृढता ॥ १ ॥ मनाचा कुठला कोपरा काही जिथे तुमचा ठसा नाही तुमच्या लावल्या वळणांनी सरळ झाले मार्ग जीवनी ॥ २ ॥ दुर्धर दुर्गमशा वाटेवरती काजळलेल्या निराशराती संस्कारांचा दीप सोबतीला आशीर्वादाचा कवडसा ओला ॥ ३ ॥ तुम्ही आम्हा दिलं नाही असं […]

माझी नाळ

आईची आठवण अशी कधी सुटलीच नाही खरं सांगू, माझी नाळ कधी तुटलीच नाही झाडापासून फांदी वेगळी कशी, असावे सूर्याहून तेज अस्तित्वाची नांदी आईवेगळी नव्हती तेव्हा किंवा आज आतड्यांचा पीळ आम्ही कधी उलगडू दिलाच नाही ॥ पाठीवरला स्पर्श असो वा नजरेतली माया मार्गदर्शी, उत्प्रेरकही, पाठीशी आश्वासक छाया आनंदाच्या झंकारांनाही अंतर्नाद आई हा राही ॥ कुणा कळावा वा […]

आईचा स्पर्श

पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला एक लयबद्ध ताल आहे जाणिवेच्या तेवत्या ज्योतीला भावनेचं संतत तेल आहे जीवनाच्या अभंगाला, मनाच्या मृदुंगाला आईचा स्पर्श आहे हरएक श्वासात, प्रत्येक निश्वासात आईचा आभास आहे मनाच्या पापुद्रयांना जपणारा नितांत विश्वास आहे हृदयाच्या स्पंदनांना, काळजाच्या वेदनांना, आईचा स्पर्श आहे. आयुष्याच्या विवंचनांची, विटंबनांची, कुचंबणांची चढाओढ आहे निर्ढावलेल्या पाषाणशिळांना उद्धाराची आतुर ओढ आहे आश्वस्त मनांना, […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..