नवीन लेखन...

देवाचा तराजू

देवा तुझ्या तराजूला एक पारडे जड का माणसाच्या ठोकळ्याला दोन हाती माप का दुर्जनांच्या पारिपत्या जन्मतो तो तूच ना हिंदवीला आगऱ्याची मग सांग ना रे कैद का शुभ्रतेच्या ज्योतीसंगे काजळी किनार का जीवनाच्या धुंद क्षणी आसवांची धार का बेरजेचा गोफ भाळी एखाद्या गुंफतोस नातं नशीबी वेदनांचं एखाद्या जोडतोस निर्जीव ठोकळ्याला विकारांची चेतना का दिव्यत्वाच्या झेपाव्याला अपूर्णतेची […]

प्रतीक

भोवतालच्या जगाकडे मी जेव्हा डोळसपणे पहातो मनाचा आरसा माझा मी अलगद उघडतो वाटतो मला आंधळा जगाच्या अधोगतीकडे पाहून घेत असेल डोळे मिटून वाटतो मला एकांध घेत असेल संधी एक डोळा मारुन दाखवत नसेल ना लंगडा जीवनातला अधूरेपणा पृथ्वीवर असता एक डोळा दूजा चंद्रावर रोखून वेध नसेल ना घेत अनंताचा एखादा चकणा पुढे आलेले दात दिसतात गाताना […]

दोन मृत्यू: एक व्यक्तीचा, एक हुद्याचा

बड्या धेंड्याचा देहान्त जाहला, राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला, जनसागर अवघा शोकसागरात बुडाला अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला का कोण जाणे कुणास कसला पत्ताच नव्हता शोक कशाला? शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले तरीही राजमहाल अपुरे पडले हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले तरी बरेच काहीसे अजूनी उरले एकाकी तू असा निजलास का रे कुणी न तुजला वारस का रे शोक […]

मजुराचे मनोगत

मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन । कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥ जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा। येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥ यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते। कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥ करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन । […]

खुर्ची

खुर्चीसाठी पोकळ बाता खुर्ची राजकीय ‘खल ‘बत्ता खुर्ची आहे माझी माता खुर्चीच सर्वस्व आता ॥ १ ॥ खुर्ची आहे तिखट मिरची आली जवळ तरीही दूरची खुर्चीसाठीच प्रवास माझा खुर्ची सोय माझ्या पोटाची ॥ २ ॥ खुर्चीसाठी हो पुण्याई गाठी खुर्ची माझी मी खुर्चीसाठी जरी प्रवेशली माझी साठी खुर्ची स्पर्धेत मी ना पाठी ॥ ३ ॥ दिल्यात […]

फुला रे

मिटून-मिटुन पाकळी, फुला रे, आता तरी पड खाली तो बघ तिकडे सूर्य मावळे तुझेही तसेच केसर पिंकले कर जागा मोकळी, फुला रे, मिटुन पड खाली ॥ सकाळची रुसली उषा गाढवा बघ आली निशा चढली रात्रीलाही काजळी, फुला रे, मीट आता पाकळी ॥ सुगंध तुझा पसरलेला जाण, हा पुरा ओसरला का तरीही जागा व्यापली फुला रे आता […]

(लाडक्या) झुरळास

वा झुरळा, खबरदार जर पंख फुलवोनी जाशील पुढे, मुडदा पाडीन तुझा गधड्या हा मी मर्द मराठ्याचा वंशज असे म्यान न करातले का तुला हे दिसे दचकलो पाहून तुला मी न कीटका मारुनच तुला मी टाकीन उसासे ॥ क्षुद्रा जरी चावला होतास मला, तरी शूर वीर मी न तुला चावलो धर्मयुद्ध खेळीन शर्थीचे मी हा पहा तलवार […]

अदुबाळा

ये अदुबाळा ये लडिवाळा माझ्या प्राजक्ताच्या फुला आसुसतो मी, आतुरतो मी तुझ्या गोड, बोबड्या बोला लावतात लळा मला तुझ्या लडिवाळ लीला पाहून तुझा गोजिरवाणा चाळा ओंजारण्या तुला, गोंजारण्या तुला उचंबळून येतो जीवाचा जिव्हाळा नाजूक साजूक मोहक क्षणांचा या भरवावा आनंदमेळा उधळावे आयुष्याचे संचित त्यावरुन ओवाळून गोळा – यतीन सामंत

अंतिम सत्य

गर्व बाळगावा ज्याचा असं आपलं आपल्याशी काही नसतं जे आहे ते कधीच नव्हतं का हे फारच उशीरा कळतं माझं माझं असं माझं माझ्यापाशी काहीच नव्हतं रुपापासून गुणापर्यंत आयुष्य सारं उसनं असतं माझं, असं माझ्यापाशी होतं का, कधी काही गुणसूत्रांची उसनवारी ही आयुष्याची नोंदवही -यतीन सामंत

न मागितलेल्या वेदना

काही बाण खूप खोलवर, जिव्हारी लागतात भरलेल्या भासूनही जखमा विव्हळत रहातात काही क्षण अश्वत्थाम्याची जखम होतात आयुष्य सरल्यावरही वेदनांना जिवंत ठेवतात एकाकीपण झाकायला आपल्या सावल्या पसरत जातात नि शरमेची टांगती शवं सारायला हात तोकडे पडतात हातांनी झाकला तरी चेहेरा स्वतःला खिजवत रहातो स्वत:पासून पळायचं असूनही पाय थिजवून ठेवतो वास्तवाची नग्नता रहाते सारं आभाळ व्यापून ‘सुखी माणसाचा […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..