नवीन लेखन...

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी,  अस्थिर आम्ही जगू शकतो अस्थिर आहे जग म्हणून,  स्थिर आम्ही जगू शकतो….१ पोटासाठी वणवण फिरे,  शोधीत कण कण अन्नाचे थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे….२ धरणी फिरते रवि भोवतीं,  ऋतूचक्र हे बदलीत जाते जगण्यामधला प्राण बनूनी,  चैतन्य सारे फुलवून आणते….३ पूरक बनती गुणधर्म परि,  स्थिर असतो वा अस्थिर ते विश्वचक्र फिरवित […]

जाळी

धागा धागा विणून,  केली तयार जाळी गोल आणि बहुकोनी घरे,  पडली निर निराळी….१, स्थिर सुबक घरे,  जसा स्थितप्रज्ञ वाटे सर्व दिशांचा तणाव,  न दिसे कुणा कोठे….२, तुटेल फूटेल तरी,  सैलपणा येणे नाही जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही….३, जगे तो अभिमानानें,  मान ठेवूनीया ताठ संसारामधील क्लेश,  झेलीत होती त्याची पाठ….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

दु:खाने शिकवले

रंग बदलले ढंग बदलले,  साऱ्या जीवनाचे बदलणाऱ्या परिस्थितीने,  तत्व शिकवले जगण्याचे….१, कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं  आनंदे….२, धुंदीमध्यें असता एका,  अर्थ न कळला जीवनाचा आले संकट दाखवूनी देयी,  खरा हेतू जगण्याचा….३, दु:खामध्ये होरपळून जाता,  धावलो इतरांपाठीं अनेक दु:खे दिसून येता,  झालो अतिशय कष्टी….४, दु:ख आपले निवारण्याते,  आनंद वाटे मनीं इतर […]

 कवीची श्रीमंती

खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार शिकला  सवरला परि    न जाणला संसार पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची श्रेष्ठ पदीचा मान देवूनी   कौतूके झाली कवितांची व्यवहारी निर्धन […]

सुप्त चेतना

दिव्याची ज्योत पेटली,  वात दिसे जळताना जळेना परि वात ती,  दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल,  देवूनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी,  तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती,  सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना,  जाणतील का कुणी ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची […]

सासरी जाताना

हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला…. ।। धृ ।।   खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो, […]

कर्तृत्वाचे कल्पतरू

जीवन गंगा वहात राही, फुलवित सारी जीवने, पडेल प्रवाहीं तिच्या कुणी,  लागते त्याला वाहणे….१, काही काळ वाहतो देह,  डूबून जाणे लक्ष्य तयाचे कसा वाहतो केंव्हां डुबतो,  वेग ठरवी हे प्रवाहाचे….२, बुडूनी जाती देह प्रवाही,  कर्मे आतील तरंगती वाहत वाहत नदी किनारी,  स्थीर होवून काठी राहती,….३, देह क्षणाचा जरी,  त्याची कर्मे चिरंतर राहती कर्तृत्वाच्या कल्पतरूनी, इतर जणांना […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे, आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे….१, जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले…..२, लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते…..३, गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ….४, असमान्य ते एकचि मिळता, […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या त्या दाढे मधूनी, […]

1 6 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..