नवीन लेखन...

घड्याळ

घड्याळ होते भिंतीवरती टिक टिक करुन चाले सतत दिसली चाल काट्यांची एकाच दिशेने हाले   धावत होता एक तुरु तरु दुजा हळूच धांवे छोटा जाड्या मंद असून पळणे ना ठावे   पळत असती पुढे पुढे समज देती काळ-वेळेचा किती राहील शिलकीमध्ये प्रवास आपुला जीवनाचा   जीवन चक्रापरि फिरती घड्याळ्यामधले सारे काटे जाणीव करुन देती सतत आपण […]

ऋणानुबंधन

ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मातृत्वाची कन्येस जाण

आई होवून कळले मजला,  कष्ट आईचे आज खरे स्वानुभवे जे जाणूनी घेई,  तुलना त्याची कोण करे….१ नवूमास तू जपला उदरी,  क्षणाक्षणाला देवूनी शक्ती बाह्य जगातून शोषून सारे,  सत्व निवडूनी गर्भा देती….२ देहावरी अघांत पडता,  झेलूनी घेई सारे कांहीं बाळ जीवाला बसे न धोका,  हीच काळजी सदैव राही….३ संगोपन ते करिता करिता,  हासत होती अर्धपोटी तू सूखी […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी, विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी, उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या […]

जीवन प्रवासी

तुझ्या घरि आले विसंबूनी,  तव प्रेमाचे पडतां बंधन सात पाऊले टाकीत टाकीत,  सोपविले तव हातीं जीवन सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या तव हाती दिली घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे ह्याच जळी ऋणानुबंधाच्या ह्या गांठी,  बांधल्या गेल्या पडतां भेटी जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ तो एक […]

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करित करित लक्ष्य तयांचे फूलपाखरू,  फुलाभोवती होते खेळत….१ भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी शोषीत असता गंध फुलांतील,  चंचल होते नजर ठेवूनी….२ व्याघ्र मावशी मनी  ही राणी,  म्याँव म्याँव म्याँव करित आली उंदीर मामा दिसत तिजला,  झेप घेण्या टपून बसली…३ शंका येता त्याला किंचीत,  झर् झर् झर् तो बिळात […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती ते चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक ते जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा […]

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी,  घरटे बांधून गेल्या त्या खेळूनी नाचूनी उड्या मारूनी,  चिव चिव करित गात होत्या झाडावरती उंच बसूनी,  रात्र घालवीती हलके हलके दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके संसार चक्र ते भोवती पडता,  गेल्या दोघी त्यातच गुंतूनी नव पिल्लाच्या सेवेसाठी,  घरटे केले काड्या आणूनी पिल्लांना त्या पंख फूटता,  उडूनी गेल्या घरटे सोडूनी अल्प […]

निसर्गाचे मार्ग आगळे

मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ चालतो त्याच दिशेने,  जसजशी येते वेळ….१ चालत आसता थांबे,  भटके वाट सोडूनी करूया काही आगळे  ठरवी तो विचारांनी….२ आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे नियतीची वाट मात्र,  त्या दिशेने जात नसे….३ परिस्थितीचे कुंपण,  टाकले जाते भोवती कळत वा नकळत,  मार्गी त्यास खेचती….४ करून घेतो निसर्ग,  वाटते त्याला हवे जे […]

स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या,  स्वप्न मजला भावते कल्पनेचे राज्य जरी असे,  आनंददायी वाटते….II धृ II तव प्रतिमा ही मनी बसवली, आठवण सदैव येवू लागली जागेपणी जे मिळे न मजला,  स्वप्नी मी सारे तेच अनुभवते…….१ स्वप्न मजला भावते, पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे हवे हवेसे मनी ठरवी ते,  केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२ स्वप्न मजला भावते, कल्पना भाव तरंगे […]

1 4 5 6 7 8 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..