नवीन लेखन...

प्रकाश आणि तम

प्रकाश आणि अध:कार तो, दोन बाजू नाण्याच्या सत्व नि तमोगुण,  ठरती त्या प्रभूच्या….१ सृष्टी दिसे समोर आपल्या, नयन ठेवूनी उघडे अध:कार वाटे आम्हां, त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२ जाण देई आंतून कुणी, प्रकाश तमाच्या आस्तित्वाची आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं, कल्पना केवळ विचारांची…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com  

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत,  छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता,  चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार,  भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी,  ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी,  रचली जाते एक कविता…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००५०७९८५० bknagapurkar@gmail.com    

स्वप्न दोष

भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।। शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।। किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।। रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।। वाऱ्याची थंड झुळुक    पुलकीत देहा […]

जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत बघा ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नी काम बरे,  तत्व हे अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करून ती,  यश मिळाले मला….४, […]

चंद्रडाग

हे शशिधरा तूं प्रेमळ सखा    साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी    राजा तूं नभाचा   लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी    काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती    तू डागाळला   डाग कसला तुम्ही मानतां    प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते   हे आम्हीं विसरतो   समजूं शकतो नीती बंधन    समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही    म्हणावे पापाचे   गुरू […]

रसिक श्रेष्ठ

कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी ।।१।।   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी ।।२।।   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा ।।३।।   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी   […]

प्राण्याचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते नक्षीदार तो पिंजरा घेवूनी,   शोभिवान मी केले घरातें…१, प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं पक्षानें त्या मान टाकली,  पडला होता तळात मरूनी…२, क्षणभर मनी ती खंत वाटली,   राग आला तो स्वकृत्याचा अकारण ती हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा…३, किती बरे ते निच मन हे?    निराशा […]

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे ते लक्ष वेधण्या,  हनुवटी खेची तो हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा तो दाखवोनी,  दुर्लक्ष करी तो मुलाकडे…२, शब्दांची ती गुंफन करूनी,  कवितेचा तो संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या […]

बडवे – पुरोहीत

बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग तो करूनी घेतो…१, पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति ती दाखविती धर्माचे ते नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती पुरोहित तो असा असावा,  धर्माची तो करि उकलन भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग ते देयी दाखवून, […]

बचाव

सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करीत  । लक्ष्य त्यांचे फूलपाखरू, फुलाभोवती होते खेळत ।।१।।   भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी  । शोषीत असता गंध फुलांतील, चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।   व्याघ्र मावशी मनी  , म्याँव म्याँव करीत आली  । उंदीर मामा दिसता तिजला, झेप घेण्या टपून बसली ।।३।।   शंका येता त्याला […]

1 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..