सासरी जाताना

हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला

विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला…. ।। धृ ।।

 

खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,

पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी

सैल कर तू पाश आपला…१,

हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

 

संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी

कुठे लोपला आज विश्वास तो,  जागृत होता सदैव मनी

नकोस देवू वाव शंकेला…२,

हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

 

ते तर केवळ घर निराळे, मायेने परि आहे भरले,

जसे मिळवले प्रेम माहेरी,  वाटीत जाईन सासरी सगळे

आठवण करिता येईन भेटीला…३,

हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला

 

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1551 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…